जळगाव : दहावीच्या मराठीच्या पेपरला भरारी पथकाने जिल्हाभरात नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शहरातील नूतन मराठा विद्यालयाच्या केंद्रावर दोन, सोनवद ता. धरणगाव केंद्रावर सहा तर संत गाडगेबाबा विद्यालय कंडारी ता. भुसावळ येथील केंद्रावर एक अशा नऊ जणांवर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, शिक्षणाधिकारी (निरंतर) लता बागुल, राज्य मंडळ पुणे सदस्या शुभांगी राठी यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.
दहावीच्या पहिल्याच पेपरला नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई
By admin | Updated: March 2, 2016 00:05 IST