शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:22 IST

Chhattisgarh Love Affair Murder: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील माझीपारा परिसरात एक धक्कादायक घटना घडली.

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील माझीपारा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका २५ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली. मृत तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता तिच्या भावाने इतर नातेवाईकांसह त्याला बेदम मारहाण केली, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीचा एक सख्खा आणि दोन चुलत भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

मृतक धीरज सरोज उर्फ विकी (वय, २५) असे मृत तरुणाचे नाव असून हा भिलाईतील माझीपारा भागात वास्तव्यात होता. धीरजचे मुख्य आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी मुलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती. तर, तिचा भाऊ कामावर गेला होता. मुलीच्या घरी कोणीच नसल्याचे समजताच धीरज तिच्या घरी गेला. थोड्याच वेळात मुलीचा भाऊ घरी आला आणि त्याने धीरजला आणि त्याच्या बहिणीला एकत्र पाहिलं. यामुळे तो संतापला आणि त्याने त्याच्या चुलत भावांना बोलावले. त्यांनी घराचा दरवाजा बंद करून धीरजला बेदम मारहाण केली. या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी धीरजच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांची कारवाई

कॅन्टोन्मेंटचे सीएसपी हेम प्रकाश नायक यांनी सांगितले की, या प्रकरणात पाच आरोपींची ओळख पटली आहे, त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे, तसेच फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनामुळे छत्तीसगडमधील भिलाईतील स्थानिक समाजात धक्काच बसला आहे. प्रेमाच्या प्रकरणातून घडलेल्या या भयंकर हत्येने सर्वांनाच शोकात पाडले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhattisgarh: Man killed by girlfriend's brother for visiting her alone.

Web Summary : In Bhilai, Chhattisgarh, a man was beaten to death by his girlfriend's brother and cousins after visiting her at home. Police have arrested three suspects and are searching for two others. The victim was found dead at the scene.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड