शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अति शहाण्याचा...! अधिकाऱ्याने मोबाइल शोधण्यासाठी अख्खा बंधारा रिकामा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 05:58 IST

दीड हजार एकर शेती आली असती सिंचनाखाली; निलंबनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क कांकेर : एखादा मोबाइल किती महत्त्वाचा असू शकतो? छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्याने बुडालेल्या मोबाइलच्या शोधात धरणाच्या बाहेरील भागातून तब्बल ४१ लाख लिटर पाणी उपसून वाया घालवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका फोनसाठी सलग तीन दिवस, दीड हजार एकर शेतजमीन सिंचनाखाली आली असती इतके पाणी उपसण्यात आले. शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस येताच जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी अहवाल मागवला आणि अधिकाऱ्याला निलंबित केले. 

   अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पखंजूर भागात धरणाच्या बाहेरील बाजूस साचलेले सुमारे ४१ लाख लिटर पाणी उपसल्याबद्दल अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांना निलंबित करण्यात आले. ते रविवारी (२१ मे) आपल्या मित्रांसह परिसरातील परळकोट जलाशयाला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी सेल्फी घेत असताना त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस २३ हा मोबाइल चुकून खोल पाण्यात पडला. गुरुवारी अधिकाऱ्याचा मोबाइल सापडल्याचे त्यांनी सांगितले.

४१ लाख लीटर पाणी वाया गेले. यामुळे हजारो एकर शेतीतील पिकांना पाणी उपलब्ध झाले असते.

अधिकारी म्हणतो...‘स्थानिक लोकांनी ही जागा फक्त १० फूट खोल आहे आणि फोन परत मिळू शकतो असे सांगितले होते. सुरुवातीला त्यांनी फोन शोधण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी ठरले.  ३-४ फूट पाणी कमी झाल्यास फोन मिळेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी पाटबंधारे विभागाच्या एसडीओंशी बोललो आणि  त्यांनी हे पाणी शेतकरी वापरत नसल्यामुळे तुम्ही ते उपसू शकता, असे सांगितले. मग मी स्थानिकांच्या मदतीने स्वखर्चाने तीन फूट पाणी काढले आणि गुरुवारी फोन सापडला. मी पाणी काढून जवळच्या तलावात पाठवले. पाण्याचा अपव्यय झाला नाही’,  असे विश्वास यांनी सांगितले.

पदाचा गैरवापरनिलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, या घटनेचा उपविभागीय अधिकारी, पखंजूर यांच्याकडून अहवाल मागविला होता, ज्यात मोबाइल फोन शोधण्याची परवानगी न घेता ४१०४ घनमीटर पाणी उपसल्याचे नमूद आहे. विश्वासने मोबाइल फोन शोधण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय लाखो लिटर पाणी वाया घालवले, जे अस्वीकार्य आहे, असेही आदेशात म्हटले आहे. एसडीओंना २४ तासांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे, तसे न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणी