शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेसची दुसरी यादी जाहीर, ५३ जणांना दिली उमेदवारी; अरुण व्होरा यांना दुर्ग शहरातून तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 05:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत दिवंगत काँग्रेस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत दिवंगत काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांचे पुत्र अरुण व्होरा यांच्या नावाचाही समावेश आहे.

पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार अरुण व्होरा यांना दुर्ग शहरातून उमेदवारी देण्यात आली आहे. व्होरा हे सध्या या जागेवरून आमदारही आहेत. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष रामपुकार सिंग यांना पत्थलगाव विधानसभा मतदारसंघातून, विकास उपाध्याय यांना रायपूर शहर पश्चिम आणि शैलेश पांडे यांना बिलासपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

याआधी, गेल्या रविवारी काँग्रेसने ३० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव आणि इतर काही वरिष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश होता. छत्तीसगडमध्ये  ९० जागांसाठी ७ आणि १७ नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक