शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video - पुतणीच्या लग्नात डान्स करताना काकाला हार्ट अटॅक; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 10:06 IST

लग्न समारंभात डान्स करताना एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. आपल्या पुतणीच्या लग्नात डान्स करत असताना काकाचा मृत्यू झाला आहे.

छत्तीसगडमधील भिलाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न समारंभात डान्स करताना एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. आपल्या पुतणीच्या लग्नात डान्स करत असताना काकाचा मृत्यू झाला आहे. नाचता नाचता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि स्टेजवरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप दल्ली हे राजहरा येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात ऑसिस्टेंट इंजिनिअर होते. 52 वर्षीय दिलीप स्टेजवर पंजाबी गाण्यांवर जबरदस्त डान्स करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्यासोबत वधू-वरही नाचत आहेत. दिलीप उत्साहात नाचत होते. तेवढ्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. 

नाचताना झाला मृत्यू 

नातेवाईकांचे म्हणणे आहे की, दिलीप हे 4 मे रोजी पुतणीच्या लग्नासाठी गावी आले होते. आनंदाच्या वातावरणात ते स्टेजवर जोरदार नाचत होते. अचानक त्यांना वेदना जाणवू लागल्याने ते स्टेजवर बसले पण थोड्या वेळाने ते खाली पडले. आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांनी त्यांना उचलून उपचारासाठी रुग्णालयात नेले, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डान्स करताना अचानक हृदयविकाराचा झटका

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दिलीप यांच्या कुटुंबात दोन मुली आणि पत्नी आहेत. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रडून रडून नातेवाईकांची वाईट अवस्था झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलेला हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्नHeart Attackहृदयविकाराचा झटकाChhattisgarhछत्तीसगड