शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. समोर सरणावर झोपून केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:00 IST

भ्रष्टाचारप्रकरणी सरपंचांना पदमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सरणावर झोपून आंदोलन केले. आंदोलनकर्त्याला सरणावरच कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

औरंगाबाद : भ्रष्टाचारप्रकरणी सरपंचांना पदमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सरणावर झोपून आंदोलन केले. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. अखेर पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. आंदोलनकर्त्याला सरणावरच कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पैठण तालुक्यातील टाकळी (अंबड) ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाबाई नरके व ग्रामविकास अधिकारी पी. डी. मोरे यांचा भ्रष्ट कारभार व त्यांनी केलेल्या अनियमिततांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी उपसरपंच प्रभाबाई निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली नरके, प्रयाग राऊत, दिलीप नरके, रामदास खवले, शिवनाथ खडके यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.

आंदोलनप्रसंगी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर सरण रचून त्यावर रामदास खवले हे झोपले. खवले यांना पांढरा कपडा गुंडाळला. गळ्यात पुष्पहार घालून त्यांना पार्थिवाप्रमाणे सजविण्यात आले. हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अखेर या आंदोलनाची दखल पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांना घ्यावी लागली. त्या आंदोलनस्थळी आल्या. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.

उपसरपंच प्रभाबाई निकाळजे, रामदास खवले यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिले की, टाकळीच्या (अंबड) सरपंच उषा नरके व ग्रामविकास अधिकारी पी.डी. मोरे यांनी केलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास प्रशासनाने जाणीवपूर्वक दिरंगाई केली आहे. ग्रामपंचायतीच्या चौकशीचे काम मागील चार महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी सदरील ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी केली. त्यामध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकाºयांवर अनियमिततेचा ठपका ठेवला असून, महिनाभरापूर्वी जि.प. पंचायत विभागास चौकशी अहवाल सादर केला आहे. तो अहवाल दडपण्यात आला आहे.

दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी सदरील प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पैठण तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद