शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

जि.प. शाळांची पटसंख्या ऐरणीवर

By admin | Updated: June 22, 2016 00:55 IST

औरंगाबाद : खाजगी शाळांनी गावागावांत जाऊन विद्यार्थी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकाही शिक्षकाने

औरंगाबाद : खाजगी शाळांनी गावागावांत जाऊन विद्यार्थी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकाही शिक्षकाने किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यांच्या अशा अनास्थेमुळे अनेक शाळांना कुलूप लागण्याची वेळ आली आहे. शिक्षकाअभावी रोज वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये पालक शाळा भरवीत आहेत. तरीही शिक्षणाधिकाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नाही. अशा अकार्यक्षम शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, अलीकडेच बदल्यांची प्रक्रिया राबवली आहे. काही शिक्षक अजूनही बदली झालेल्या शाळेत रुजू झालेले नाहीत. सध्या हाती घेण्यात आलेली पदोन्नतीची प्रक्रिया आटोपल्यानंतर शाळानिहाय शिक्षकांची स्थिती काय आहे, यासंबंधीचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवून घेतला जाईल. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे, ही बाब खरी आहे. यासंदर्भात आपण प्रवेश पंधरवडा राबवत आहोत. यापूर्वी जिल्ह्यांतील शाळांमध्ये असलेली विद्यार्थी संख्या आणि प्रवेश पंधरवडा राबविल्यानंतरची विद्यार्थी संख्या, या संबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना दिले.बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा मुद्दा चर्चेला आणला. ते म्हणाले की, मी स्वत: माझ्या सर्कलमधील विविध शाळांना भेटी देत आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत एकदाही शिक्षणाधिकाऱ्यांनी एकाही शाळेला भेट दिली नाही. त्यांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख किंवा शिक्षकांना सांगितले नाहीत. आजही अनेक शाळांना शिक्षक नाहीत. यासंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगण्यात आले; पण त्यांनी सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले. सदस्य मनाजी मिसाळ, दीपकसिंह राजपूत, शैलेश क्षीरसागर, पुष्पा जाधव, मनोहर गवई, पुष्पा केंदारे यांनीही शिक्षणाधिकारी कोणत्याही तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप केला. शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी पैठणच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर पैसे घेऊन नांदर जि.प. शाळेत शिक्षक भरल्याचा खळबळजनक आरोप केला. त्या शाळेतील एका शिक्षकाचे अपघाती निधन झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या शाळेवर पैसे घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली, असे ते म्हणाले.अनेक शाळांवर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; पण तेथे शिक्षक नाहीत, तर दुसरीकडे अनेक शाळा अशाही आहेत की तिथे विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्या शाळांमध्ये मात्र शिक्षक जास्तीचे आहेत. जिथे शिक्षकांची गरज आहे, अशा शाळांमध्ये शिक्षकांना पाठविण्याबद्दल वारंवार गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले जाते. मात्र, ते ऐकत नाहीत. गटशिक्षणाधिकारी शिक्षकांना का जपतात, हेच कळत नाही, असे तांबे म्हणाले.