शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ‘सीएसआर’ निधीसाठी कंपन्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:46 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी यासाठी काही उद्योगांना पत्रव्यवहार केला आहे

औरंगाबाद : मंजूर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णसेवा सुरू करण्यासाठी उपकरणांची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी यासाठी काही उद्योगांना पत्रव्यवहार केला असून, ‘सीएसआर’ फंडातून आरोग्य केंद्रांना उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. ३० हजार लोकसंख्येच्या गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तर ५ हजार लोकसंख्येसाठी उपकेंद्र सुरू करण्याचा मानक आहे. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने वाळूज, शिवना, चौका, पिंपळगाव वळण आणि भराडी असे ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर ४२ उपकेंद्रांना शासनाची मान्यता मिळाली आहे.त्यापैकी वाळूज व शिवना येथे आरोग्य केंद्रांसाठी नवीन इमारत तयार करण्यात आली.

वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मनुष्यबळही मंजूर झाले आहे; पण केवळ उपकरणे व फर्निचरसाठी निधीची गरज आहे.  त्यासाठी अधिक वेळ वाया न घालवता वाळूज परिसरातील उद्योगांना ‘सीएसआर’ फंडातून निधी देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. 

मंजूर ४१ उपकेंद्रांपैकी १४ उपकेंद्रांच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. ४  इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे, तर २४ उपकेंद्रांच्या इमारतीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. मंजूर उपकेंद्रांपैकी औरंगाबाद तालुक्यात १०, फुलंब्रीत ४, वैजापूर  १२, गंगापूर  ५, कन्नड ३, तर पैठण तालुक्यात ८ उपकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. 

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचनाग्रामीण रुग्णसेवा अधिक तत्पर व दर्जेदार करण्यावर जिल्हा आरोग्य विभागाने भर दिला असून, यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व संलग्नित अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न येता अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयास कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायfundsनिधीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद