शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आज ठरणार !

By admin | Updated: March 20, 2017 23:22 IST

जालना : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे.

जालना : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवडणूक होत असून, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे अवघ्या जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे २२, शिवसेना १४, राष्ट्रवादी काँग्रेस १३, काँग्रेस ५ आणि अपक्ष दोन सदस्य निवडून आले आहेत. सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या असल्या तरी बहुमतापासून ७ जागा दूर असल्याने चुरस निर्माण झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी विविध राजकीय आयुधांचा वापर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भाजपाची घौडदौड रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगे्रसचे नेते एकत्र आल्याची चर्चा गत काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे. या नेत्यांमध्ये आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चाही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दक्षता म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. हे सर्व सदस्य मतदानाच्या वेळी सभागृहात अवतरणार आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजपा नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, संपूर्ण राजकीय अनुभव या नेत्यांनी पणाला लावला आहे. आपल्या राजकीय ‘पॉकेटस्’ला धक्का न लागता राजकीय समीकरणे जूळवून आणण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह कोअर कमिटीची बैठकही झालेली आहे. या बैठकीतील तपशील कळू शकला नसला तरी मुंबईतून सूत्रे हलली तर राजकीय चमत्कार होण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधत सत्ता स्थापण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या. रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडींनी वेग घेतला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे या निवडणुकीत काय चमत्कार घडवून आणतात याकडे राजकीय तज्ज्ञांचेही लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर कोणती राजकीय खेळी खेळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.