शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

१ जानेवारीपासून युवक काँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:50 IST

येत्या १ जानेवारीपासून महाराष्टÑात युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगाव जातील. तेथील शेतकरी व युवकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांची नोंदणी करून घेतील, अशी माहिती आज येथे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

ठळक मुद्दे‘राहुल गांधी बनून सत्ता आणण्यासाठी परिश्रम करण्याचे आवाहन

औरंगाबाद : येत्या १ जानेवारीपासून महाराष्टÑात युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगाव जातील. तेथील शेतकरी व युवकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांची नोंदणी करून घेतील, अशी माहिती आज येथे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.आज मौलाना आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल येथे युवक काँग्रेसची विभागीय बैठक झाली. या बैठकीतच मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्याचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सुमारे २५ हजार गावांमधून व ५०० शहरांमधून १० फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता आल्याने महाराष्टÑातही बदल घडणार असा आत्मविश्वास घेऊन युवक काँग्रेसमध्ये प्राण ओतण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विभागीय बैठकीकडे पाहिले जात आहे.महाराष्टÑ युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी व सहप्रभारी मनीष चौधरी यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले. बूथ कमिट्या स्थापन करतील, त्याच कार्यकर्त्यांना यापुढे पदे दिली जाणार असल्याचे मनीष चौधरी यांनी यावेळी जाहीर केले. विकास आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन आपल्याला आगामी निवडणुका जिंकायच्या असल्याचेही ते म्हणाले.प्रतिभा रघुवंशी यांनी सांगितले की, मध्यप्रदेशात ज्या युवक कार्यकर्त्यांना कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यांनी मंत्री असलेल्या उमेदवारांनाही पाडून दाखविले. आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांचे हात मजबूत करावयाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने राहुल गांधी बनून जातीय व धर्मांध शक्तींना हरवण्यासाठी काम केले पाहिजे.१९७८ सालचे कार्यकर्ते बनून काँग्रेसला विजयी करण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी यावेळी केले. वाढती बेरोजगारी, युवकांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष, रोजगार निर्मितीचे खोटे आश्वासन देणाºया भाजप सरकार विरोधात राष्टÑीय युवक काँग्रेसच्या वतीने कन्याकुमारी ते काश्मीर, अशी युवा क्रांती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ८ ते ११ जानेवारी या दरम्यान महाराष्टÑातून जाणार आहे. मोदी सरकारने निराश केलेल्यांना धीर देऊन त्यांना भक्कम बनविण्याची भूमिका युवक काँग्रेस निभावत असल्याचे तांबे यांनी सांगितले. शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर खान, जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर, प्रभाकर मुठ्ठे पाटील, बाबासाहेब पवार, नागसेन भेरजे आदींनी या बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण