शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:09 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुकुंदवाडी भागातील अंबिकानगर येथे घडली.

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुकुंदवाडी भागातील अंबिकानगर येथे घडली.विजय ईश्वर सनान्से (२१) असे या युवकाचे नाव आहे. तो आई आणि भावासह अंबिकानगर भागात राहतो. वडिलांचे निधन झालेले असून, आई काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवते. विजयने पोलीस भरतीची तयारी सुरू केली होती. अनेक ठिकाणी नोकरीसाठी तो फिरला; परंतु कोठेही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे तीन-चार दिवसांपूर्वी विजयने वडापावचा गाडा टाकून रोजगार सुरू केला होता; परंतु त्यातही त्याला समाधान मिळाले नाही. मंगळवारी सकाळीच आई कामावर गेली होती. छोटा भाऊही बाहेर गेला. विजय एकटाच घरी होता. त्याने राहत्या घरी पत्र्याच्या बल्लीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब गल्लीतील मित्रांच्या निदर्शनास आली. त्याला फासावरून उतरवून घाटीत दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक अमोल मस्के करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी