शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महापौरसाहेब, तुमच्या कारभाराचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला : हरिभाऊ बागडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 20:05 IST

कारभार सुधारण्याचा दिला घोडेलेंना सल्ला

ठळक मुद्देपुढच्या काळात ही परिस्थिती सुधारली पाहिजे

औरंगाबाद : महापौर सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरात कितीतरी चकरा मारतात. चांगले काम करतात; परंतु लोक  अजूनही तुमच्या कारभाराविषयी नाराज आहेत. त्याचा फटका माझे मित्र चंद्रकांत खैरे यांना बसला आहे. त्याचे दु:ख अजूनही आहे. त्यामुळे पुढच्या काळात ही परिस्थिती सुधारली पाहिजे, असा सल्ला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिला.

सिडको बसस्थानकात उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टचे बुधवारी (दि. २८) भूमिपूजन झाले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना हरिभाऊ बागडे बोलत होते. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची खंत हरिभाऊ बागडे यांनी बसपोर्टच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केली. महापौरांनी पुढच्या काळात परिस्थिती सुधारली पाहिजे. त्यासाठी लागेल ती मदत सरकारकडून मागावी. ती मदत द्यायला सरकार तयार आहे. केवळ परिस्थिती सुधारावी, अशी अपेक्षा हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. 

‘रस्ता तेथे एसटी’ असे म्हटले जाते; परंतु रस्ते खूप झाले आहेत; परंतु अनेक ठिकाणी एसटी जात नाही. किमान दिवसभरातून एकदा तरी तेथील लोकांसाठी बस गेली पाहिजे, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.

सगळ्या बस सुधाराव्यातएसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस आली; परंतु सगळ्याच बसगाड्या तशा नाहीत. त्यामुळे यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, असेही हरिभाऊ बागडे म्हणाले.

प्रक्रिया अंतिम स्वरूपातमध्यवर्ती बसस्थानक, बसपोर्टच्या निविदा काढल्या. याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. लवकरच काम सुरूहोईल, असे एसटी महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक (स्थापत्य) राजेंद्र जवंजाळ म्हणाले.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबादMayorमहापौर