शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

यंग इलेव्हन, लकी स्टार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:05 IST

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन स्टार, लकी सी. सी. आणि देवळाई संघांनी विजय मिळवला. राजेश कीर्तिकर, इम्रान पटेल, हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन स्टार, लकी सी. सी. आणि देवळाई संघांनी विजय मिळवला. राजेश कीर्तिकर, इम्रान पटेल, हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.सकाळच्या सत्रात देवळाई संघाने एआरसीसीविरुद्ध ९ बाद १९८ धावा केल्या. त्यांच्याकडून राजेश कीर्तिकरने २५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या. नुरुल सय्यदने ३७, नीलेश राठोडने २७ व अबुबकर पटेलने २३ धावा केल्या. मयंक विजयवर्गीय व रोहन शाह यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एआरसीसी संघ ४ बाद १५९ धावा करू शकला. त्यांच्याकडून रोहन शाहने ४५ चेंडूंत ५ चौकार, ४ षटकारांसह ६५, दशवीरसिंगने ३७ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात पटेल इलेव्हनने ७ बाद १२६ धावा केल्या. त्यांच्याकडून विद्येश निंभोरकरने ४४ धावा केल्या. लकी सी. सी.कडून मोहमद वसीमने २४ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात लकी सी.सी.ने १५.१ षटकांत ४ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून इम्रान पटेलने २३ चेंडूंत ७ चौकार, २ षटकारांसह ४९ व मुसा सोहेलने २३ धावा केल्या.तिसºया सामन्यात यंग इलेव्हन स्टार संघाने २० षटकांत ६ बाद १८८ धावा केल्या. त्यांच्याकडून नौशाद हाशमीने ३१ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह ४६, संजन भारतने २१ चेंडूंत ९ चौकारांसह ४२ व हुसेन अमोदीने १४ चेंडूंत ५ चौकारांसह २७ व ए. सीमेने १० चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद २७ धावा केल्या. प्रत्युत्तरात साई सी. सी. ६ बाद १३२ धावा करू शकला. त्यांच्याकडून कुणाल पाराशरने ४५, आकाश बोराडेने २१ व ओमकारने २८ धावा केल्या. यंग इलेव्हन स्टारकडून हुसेन अमोदी, मुनीर गाझी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.