शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रिक्षात विद्यार्थिनीची छेड, प्रसंगावधान राखत महिला वकील आली धावून, नागरिकांनी आरोपींना दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 17:24 IST

रिक्षात बसल्यानंतर एका प्रवाशाने काही अंतर गेल्यानंतर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

औरंगाबाद : बाबा पेट्रोल पंप येथून एमजीएम शिक्षण संस्थेकडे येत असलेल्या एका विद्यार्थिनीची रिक्षात बसल्यानंतर छेड काढण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी रिक्षाचालकास चोप देत पोलीस ठाण्यात पकडून आणले. दुसरा आरोपी पळून गेला. मध्यरात्री उशिरापर्यंत क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

क्रांती चौक ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, एमजीएम संस्थेत शिक्षण घेत असलेली एक विद्यार्थिनी बाबा पेट्रोल पंप येथून रिक्षात (एमएच २० ईएफ ९००६) सेव्हन हिल येथे जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा गयास अस्लम बागवान (वय ३०, रा. गारखेडा परिसर) याच्या रिक्षात बसल्यानंतर एका प्रवाशाने काही अंतर गेल्यानंतर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने त्याच्या थोबाडीत मारली. त्याचवेळी चालकही छेड काढणाऱ्याची साथ देऊ लागला. त्यामुळे मुलीने आरडाओरड करीत रिक्षा थांबवली. त्याचवेळी जवळून जात असलेल्या एका वकील महिलेने दुचाकी थांबवत विद्यार्थिनीस मदत केली. त्याचवेळी रिक्षाचालकाच्या थोबाडीतही दिली. यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. तेव्हा दोघांपैकी एक जण पळून गेला. एकास नागरिकांनी मारहाण करीत पकडून नंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले. ठाण्यात विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

माहिती देण्यास टोलवाटोलवीनागरिकांनी पकडून रिक्षाचालकास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीच्या पत्नीनेही ठाण्यात येत तक्रार देणाऱ्या विद्यार्थिनीस दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तरीही विद्यार्थिनी तक्रार देण्यावर ठाम राहिली. या घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. याविषयी निरीक्षक गणपत दराडे यांना विचारले असता त्यांनी आपण दवाखान्यात असल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात रात्री १० वाजेच्या सुमारास एकही उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी उपस्थित नसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद