शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉकवरील कोलकात्याची मैत्रीण समोर दिसताच तरुणाने ठोकली धूम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 06:00 IST

ओळखीचे प्रेमात रूपांतर

औरंगाबाद :  समाजमाध्यमाच्या मोहजाळात दोन जीव असेच ओढले गेले. ती दहावीत, तर तो  बी. कॉम. फायनलला. टिकटॉक नावाच्या सोशल मीडियावर त्यांचं प्रेम जुळलं अन् ती त्याच्या भेटीसाठी थेट कोलकात्याहून औरंगाबादेत आली. मात्र ती समोर दिसताच मॅकेनिक तरुणाने धूम ठोकली.सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे पुढे मैत्री अन् प्रेमात रुपांतर झाले. मग  त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी ती थेट कोलकात्याहून औरंगाबादला आली. ती असे काही धाडसी पाऊल उचलेल, असे त्याला वाटले नाही. मात्र, जेव्हा ही परिस्थिती सत्यात उतरली तेव्हा त्याने गावी जाणे पसंत केले. पुंडलिकनगर  पोलिसांनी मुलीच्या नातेवाईक आणि कोलकाता पोलिसांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले आणि तिला त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सांगितल्यानुसार हे ऑनलाईन युगुल  टिकटॉक बंद झाल्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर भेटू लागले. त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक दिले, घेतले. ते व्हॉट्सॲपवर चॅटिंग करू लागले. व्हिडिओ कॉल करून संवादही साधत. आई रागावल्याने  २० नोव्हेंबरला ती १७ हजार रुपये घेऊन घराबाहेर पडली. 

पश्चिम बंगालहून औरंगाबादचा प्रवासn हावडा रेल्वे जंक्शन येथून संबंधित मुलगी रेल्वेने नागपूरला आली. तेथून अकोला व मंगळवारी थेट औरंगाबादेत पोहोचली. n प्रवासात ती फोनवरून सतत त्याच्या संपर्कात होती. ती खरेच औरंगाबादला येईल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. n परंतु हे स्वप्न सत्यात उतरत असल्याचे पाहून तो घाबरला. काय करावे हे न सुचल्याने तो तिला न भेटताच गावी निघून गेला.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकwest bengalपश्चिम बंगाल