शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'तू मर आणि मला मुक्त कर'; कंपनीतील मुलीसोबत अनैतिक संबंधातून पत्नीस केले आत्महत्येस प्रवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 17:46 IST

कुटुंबाने बळजबरीने लग्न लावून दिल्याचा पतीचा दावा

ठळक मुद्देनवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळेच उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्यावेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद : नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा आणि अनैतिक संबंधाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार आईने वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नवऱ्याविरुद्ध नोंदविण्यात आला.

चिकलठाणा एमआयडीसीतील कंपनीत अभियंता व पदमपुरा भागातील रहिवासी विवाहितेने पाच दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.भाड्याने राहणारा अंकुश शिवाजी सूर्यवंशी (मूळ गाव रा. किट्टी आडगाव, ता. माजलगाव, जि. बीड, ह.मु. सुयोग कॉलनी, पदमपुरा) याची पत्नी मेघनाने २१ ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांनी मेघनाचा मृतदेह वेदांतनगर पोलीस ठाण्यात नेऊन नवऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मेघनाची आई उषा सूर्यवंशी यांनी २५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मेघनाचा पती अंकुशविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

तक्रारीनुसार, अंकुशचे कंपनीतील सहकारी मुलीसोबत अनैतिक संबंध होते. कुटुंबाच्या दबावापोटी विवाह केल्याचे त्याने मेघनाला अनेक वेळा सांगितले, तसेच त्या मुलीसोबतचे छायाचित्रही त्याने पत्नीला दाखविले. तेव्हापासून तो पत्नीला शारीरिक, मानसिक त्रास देत होता. लग्नात टी.व्ही., फ्रीज, सोफासेट, गॅस, कूलर दिलेला नाही म्हणून अंकुश हा माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी पत्नीला त्रास देत होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक प्रमोद देवकते पुढील तपास करीत आहेत. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

तू मर आणि मला मुक्त करअंकुश हा मेघनाला घटस्फोट घेण्यासाठी सतत आग्रह करीत होता. मेघना त्याला सांगत होती, आपले लग्न ८ महिन्यांपूर्वीच झाले आहे. तुम्ही आधीच माझ्याबरोबर लग्न करायला नको होते. आम्ही चांगले लोक आहोत. सोडचिठ्ठी दिल्यास समाजात बदनामी होईल. मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटल्यावर अंकुश हा मेघनाला म्हणत असे की, तू मर आणि मला मुक्त कर, ही बाब तिने आईला सांगितल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद