शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

योगाच्या विद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धाव घेत बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठ प्रशासन चौकशी करीत असून, दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले. योगशास्त्र विभागप्रमुखपदी डॉ. सुधाकर शेंडगे यांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : कॉपीच्या योग-योगावर खळबळ; चौकशी थांबविण्यासाठी प्रयत्न

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धाव घेत बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठ प्रशासन चौकशी करीत असून, दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले. योगशास्त्र विभागप्रमुखपदी डॉ. सुधाकर शेंडगे यांची नियुक्ती केली आहे.विद्यापीठातील योगशास्त्र विभागाच्या सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. योगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्या पेपरला एका बाकावर दोन विद्यार्थी बसले होते. बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉपी केली. हा सामूहिक कॉपीचा प्रकार फाईन आर्ट विभागाच्या सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने अद्याप सीसीटीव्ही फुटेज तपासले नसल्यामुळे कॉपीबहाद्दरांचा शोध लागला नाही. योगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख बदलणार असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोमवारी जाहीर केले, तसेच कॉपीचा प्रकार घडला असल्यामुळे परीक्षेबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या प्रकारामुळे योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू आणि प्रकुलगुरूंची भेट घेऊन म्हणणे मांडले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे उपस्थित होते. प्रशासन चौकशी करीत असून, योग्य निर्णय घेण्यात येईल. दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्रकुलगुरू डॉ. तेजनकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना एकत्रित करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली. योगशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता साबळे यांची परवानगी नसताना परीक्षा केंद्र परस्पर फाईन आर्ट विभागात हलवण्यात आले होते. परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय कोणी घेतला? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. सीसीटीव्ही फुटेज देण्याबाबत फाईन आर्ट विभागप्रमुख डॉ. शिरीष अंबेकर टाळाटाळ का करीत आहेत, अशी विचारणा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली. या प्रकारात डॉ. स्मिता साबळे यांचा हलगर्जीपणा दिसला आहे. मनमानी कारभार करून स्वत: परीक्षार्थी असलेले डॉ. जयंत शेवतेकर आणि डॉ. शिरीष अंबेकर यांच्यावर संघटित गुन्हेगारीअंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली. कुलगुरूंना दिलेल्या निवेदनावर अमोल दांडगे, दीपक बहिर, आकाश हिवराळे, अक्षय गुरव, दीक्षा पवार यांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र