शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

यंदा नांदेडमध्ये होणार राज्यस्तरीय योग दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 14:32 IST

देशातील विविध भागातून योग शिबिरासाठी नागरिक उपस्थित राहणार आहेत़ 

ठळक मुद्दे१ लाखाची राहणार उपस्थिती यशस्वीतेसाठी जिल्हा सनियंत्रण कक्षाची स्थापना

नांदेड- आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त नांदेड येथे राज्यस्तरीय योग दिन सोहळा २१ जून रोजी साजरा करण्यात येणार असून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री, प्रधान सचिव यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली़ 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची उपस्थिती राहणार असून योगसत्राचे संचालन स्वामी रामदेव बाबा हे करणार आहेत़ स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली  योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे़ अंदाजे १ लाख लोकांना एकाच वेळी योगासने करता येतील, अशी व्यवस्था असर्जन येथील ३२ एकर शासकीय जमिनीवर करण्यात येणार आहे़ या कार्यक्रमासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीची बैठकही घेण्यात आली़ 

या योग शिबिरात नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयातील  इयत्ता ९ वी ते ११ वी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच वैद्यकीय महाविद्यालय, दंत विद्यालय, एनसीसी, एनएसएस मधील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासाठी प्रशासनामार्फत निर्देश दिले आहेत़ योग साधनेसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ देशातील विविध भागातून योग शिबिरासाठी नागरिक उपस्थित राहणार आहेत़ १२, १३ व १४ जून या तीन दिवसामध्ये शासकीय, खाजगी शाळा, कॉलेज येथील पीटी शिक्षकांसह प्रश्क्षिण ए़ के़ संभाजी मंगल कार्यालय, येथे सकाळी ६ ते  ८ या कालावधीत देण्यात येत आहे़ १७ जून पासून शाळा, महाविद्यालय सुरू होणार असून १७, १८ व १९ जून या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी सकाळी ७ ते ८ या वेळेत त्या त्या शाळा, महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ या शिबिरामध्ये ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचारी तसेच तालुक्यातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनाही १३ ते १५ जून या दिवशी योग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे़ त्यांच्या मार्फत गावपातळीवर १७ ते १९ जून या दरम्यान योग विषयक    प्रशिक्षण देण्यात येणार आहे़  

जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापनाआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड येथे २१ जून रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी़आरक़ुंडगीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ या कक्षामध्ये ३१ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत़ याबरोबरच कार्यक्रम ठिकाण असलेल्या योगभूमी, मामा चौक, असर्जन, कौठा येथील व्यवस्थापन व सनियंत्रणावर हा कक्ष देखरेख ठेवणार आहे़ 

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदेNandedनांदेडState Governmentराज्य सरकार