शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

व्वा..! रुग्णांचीही ‘हॅपी दिवाली’, मोतीचूर, गुलाबजामचा आस्वाद

By संतोष हिरेमठ | Updated: November 13, 2023 12:53 IST

घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालय, ‘सिव्हिल’मधील रुग्णांना सुखद धक्का

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांना रविवारी जेवणात गोडाधोडाचे जेवण देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. मिक्स व्हेज, पुलाव, आलू मटर, मोतीचूर लाडू, गुलाबजाम असे मिष्टान्न भोजन देण्यात आले.

दिवाळीनिमित्त घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासह शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. गोरगरीब रुग्णांचे आधारवड असलेल्या घाटीत दुपारच्या जेवणात मिष्टान्न भोजन देण्यात आले. यामध्ये यंदा पोळी, मिक्स व्हेज, पुलाव, मोतीचूर लाडू असा बेत होता. सुमारे ५७५ रुग्णांना हे भोजन देण्यात आल्याची माहिती आहारतज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी दिली. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी नियोजन करण्यात आले. घाटी रुग्णालयाबरोबरच शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल कर्करुग्णांनाही मिष्टान्न भोजन देण्यात आले.

‘सिव्हिल’मध्येही मस्त मेजवानीजिल्हा सामान्य रुग्णालयात दाल तडका, आलू मटर, जिरा राईस, पोळी, गुलाबजाम असा बेत होता. सोबत फराळही देण्यात आला. रुग्णालयातील जवळपास ६० रुग्णांना मिष्टान्न भोजन देण्यात आल्याची माहिती आहारतज्ज्ञ रश्मी जोशी यांनी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी नियोजन करण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDiwaliदिवाळी 2023hospitalहॉस्पिटल