शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

व्वा रे चालाखी ! सिलिंडर २३४ रुपयाने वाढविले अन्‌ केवळ १० रुपये कमी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 7:34 PM

The price of a cylinder was increased by Rs 234 and the price was reduced by only Rs 10 दर महिन्याला सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सरकारने सर्वसामान्यांना पोळून काढले आहे.

ठळक मुद्देज्याप्रमाणे दर वाढविले त्या प्रमाणात कमी करा सिलिंडरच्या किमती ५०० रुपयांवर स्थिर ठेवा, असे जनतेचे म्हणणे आहे.

औरंगाबाद : पाच महिन्यांत २३४ रुपयांनी वाढविलेल्या सिलिंडरच्या किमती आणि एप्रिल महिन्यात केवळ १० रुपयांनी सिलिंडरचे दर कमी करून महागाईवर सारवासारवी करण्याचा केलेला प्रयत्न. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्यांची केलेली एकप्रकारे क्रूर चेष्टाच आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे.

कोरोनाने आधीच सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटून टाकली आहे. अशातच दर महिन्याला सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सरकारने सर्वसामान्यांना पोळून काढले आहे. तेल, धान्य, पेट्रोल, डिझेल या जोडीला घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीचाही भडका उडाला आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता आता होरपळून निघत आहे. त्यामुळे जर सिलिंडरच्या किमती कमी करायच्या असतील तर ज्याप्रमाणे दर वाढविले त्या प्रमाणात कमी करा आणि सिलिंडरच्या किमती ५०० रुपयांवर स्थिर ठेवा, असे जनतेचे म्हणणे आहे.

२३४ रुपयांनी वाढले दरऔरंगाबाद शहरात घरगुती वापराचे सिलिंडर नोव्हेंबर २०२० मध्ये ५९४ रुपयांना मिळत होते. एकाच महिन्यात किमती १०० रुपयांनी वाढल्या आणि सिलिंडर ६९४ रुपयांना मिळू लागले. फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरची किंमत ७६९ रुपये झाली तर मार्च महिन्यात तब्बल ८२८ रुपये सिलिंडरसाठी मोजावे लागले.

गरिबांना घेणे शक्य नाहीसिलिंडरच्या वाढलेल्या किमतीला खरोखरच आता वैतागलो आहे. प्रत्येक वेळी सिलिंडर घेताना मागच्या पेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात, सरकारने एकीकडे उज्वला गॅस दिले, मात्र सिलिंडरच्या किमती आता इतक्या वाढवून ठेवल्या की, गरिबांना ते घेणेही शक्य नाही. या गोष्टीकडे कुठल्याही राजकीय पक्षांचे लक्ष नाही, गरीब जनता मात्र मरत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ५०० रुपयांपेक्षा जास्त नको.- डॉ.योगिता कथले

सर्वसामान्यांची चेष्टा आहेकिंमत वाढविताना भरमसाठ वाढविणे आणि कमी करताना मात्र केवळ १० रुपयांनी कमी करणे, ही तर सर्वसामान्यांची चेष्टा आहे. दर महिन्याला निदान ५० रुपये याप्रमाणे शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती पुढील काही महिन्यांमध्ये कमी केल्या पाहिजेत. गॅस सिलिंडर घेणे आता खरोखरच हळूहळू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होत आहे.- रेखा नाडे

असे वाढले दर -नोव्हेंबर २०२०- ५९४ रुपये.डिसेंबर २०२०- ६९४ रु.जानेवारी २०२१- ६९४ रु.फेब्रुवारी २०२१- ७६९ रु.मार्च २०२१- ८२८ रु.एप्रिल २०२१- ८१८ रु.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरAurangabadऔरंगाबाद