शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

भारीच! शासकीय दंत महाविद्यालयात आणखी एक ‘पीजी’ अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:30 IST

आता नऊ पैकी आठ विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ‘सामाजिक दंतशास्त्र’ विषयात पदव्युत्तर पदवी (एम. डी. एस) अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. २०२५-२६ या वर्षासाठी तीन विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील.

शासकीय दंत महाविद्यालयात आतापर्यंत आठ विषयांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम होते. आता त्यात आणखी एका अभ्यासक्रमाची भर पडली आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ‘सामाजिक दंतशास्त्र’ (पब्लिक हेल्थ डेन्टिस्ट्री) या विषयात ‘पीजी’ सुरू होणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त राजीव निवतकर, सहसंचालक (दंत) डाॅ. विवेक पाखमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डाॅ. माया इंदूरकर, सामाजिक दंतशास्त्र विभागप्रमुख डाॅ. जगदीशचंद्र वठार, डाॅ. हर्षल बाफना आदींनी यासाठी प्रयत्न केले. शासकीय दंत महाविद्यालयात आता ९ पैकी केवळ एका म्हणजे बालदंतरोगशास्त्र विषयात ‘पीजी’ सुरू होणे बाकी आहे. यासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेले ‘पीजी’ अभ्यासक्रमविषय - विद्यार्थी संख्याकृत्रिम दंतशास्त्र- ६दंत शल्यशास्त्र - ३मुख शल्यशास्त्र- ३दंत परिवेष्टन शास्त्र- ३मुख विकृती शास्त्र- ३मुखरोग निदान व क्ष-किरण- ३दंत व्यंगोपचार शास्त्र- ३

‘बालदंतरोगशास्त्र’साठी प्रयत्नशीलसामाजिक दंतशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. महाविद्यालयातील हा आठवा ‘पीजी’ अभ्यासक्रम ठरला आहे. आता बालदंतरोगशास्त्र विषयातही ‘पीजी’ सुरू होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.-डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMedicalवैद्यकीय