शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटस्अ‍ॅप’द्वारे साहित्यप्रेमींना एकत्र आणण्याचा स्तुत्य प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:42 IST

व्हॉटस्अ‍ॅपसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना एकत्र आणणे अतिशय स्तुत्य असून, हा सोशल मीडियाचा खऱ्या अर्थाने विधायक वापर

औरंगाबाद : व्हॉटस्अ‍ॅपसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना एकत्र आणणे अतिशय स्तुत्य असून, हा सोशल मीडियाचा खऱ्या अर्थाने विधायक वापर असल्याचे मनोगत साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान आयोजित दुसºया राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांनी एकमुखाने व्यक्त केले.

रविवारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार दुर्गेश सोनार हे संमेलनाध्यक्ष होते. आ. अतुल सावे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज तौर, पी. विठ्ठल, उत्तम बावस्कर, के. एस. अतकरे, डॉ. दैवत सावंत, सायराबानो चौगुले, सागरराजे निंबाळकर, डॉ. राज रणवीर, मुरलीधर जगताप यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

साहित्य काव्यगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली आणि व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून साहित्यप्रेमी एकत्र येत असून, त्यातून साहित्य संमेलन कसे आकाराला येत गेले, याविषयी माहिती दिली.

मान्यवरांच्या हस्ते ‘कथा नवलेखकांच्या’ या कथासंग्रहाचे तसेच ई- बुक कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मानवी जीवन समजून घेतले तरच साहित्य समजून घेता येते, अशा शब्दांत डॉ. तौर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सध्याचा काळ हा कसोटीचा असून, या काळात आपण साहित्यिक म्हणून व्यक्त होणे, आत्यंतिक गरजेचे असल्याचे सोनार यांनी सांगितले. तर साहित्यिकांना योग्य असा मान, सन्मान, महत्त्व मिळत नसल्याची खंत आ. सावे यांनी व्यक्त केली. संदीप ढाकणे, आशा डांगे यांनी संचालन केले.

संमेलनाच्या दुसºया सत्रात डॉ. तौर यांच्या अध्यक्षतेखाली ‘समाज माध्यमे आणि वाचन संस्कृती’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यानंतर सायराबानो चौगुले आणि अरुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेगवेगळी कविसंमेलने उत्स्फू र्तपणे पार पडली.

साहित्य संमेलनातील पुरस्कार विजेते१. साहित्य काव्यगंध प्रा. डॉ. नरेंद्र मारवाडे स्मृती पुरस्कार- डॉ. विद्या सुर्वे- बोरसे.२. साहित्य काव्यगंध स्व. नारायणराव डांगे स्मृती साहित्यप्रभा पुरस्कार- डॉ. पृथ्वीराज तौर.३. साहित्य काव्यगंध जीवन गौरव पुरस्कार- डॉ. शरयू शहा४. साहित्य काव्यगंध संघर्षयात्री पुरस्कार- कवी आकाश देशमुख. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद