शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

चिंताजनक ! यंदा स्थलांतरित पक्षांचे जायकवाडी धरणाकडे येणे लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 19:22 IST

Jayakwadi Dam Bird Watching Aurangabad दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत दाखल होणाऱ्या पक्ष्यांचे आगमन यंदा डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही झाले नाही

ठळक मुद्देपक्षाच्या अधिवासावर आलेली बंधने व हवामानातील बदलाचा फटकादेशी-विदेशी पक्षाचे आगमन संथगतीने

- संजय जाधव

पैठण : जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षाचे आगमन लांबले असून ऑक्टोबर महिन्यांच्या मध्यापर्यंत हजारोच्या संख्येने नाथसागराच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरीत पक्षांनी यंदा चक्क जायकवाडी पक्षी अभयारण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्षाच्या अधिवासावर आलेली बंधने व हवामानातील बदलाचा फटका स्थलांतरित पक्ष्यांना बसला आहे. 

दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत दाखल होणाऱ्या पक्ष्यांचे आगमन यंदा डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही न झाल्याने पक्षीमित्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. युरोप, रशिया, सौदी अरेबिया यासह आशिया खंडाच्या विविध भागात हिवाळ्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते. पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा भासतो. त्यामुळे दरवर्षी तेथील पक्षी जायकवाडी धरणावर स्थलांतर करतात. साधारणतः ऑक्टोबरच्या मध्यानंतर हे पक्षी जायकवाडी धरणाच्या जलाशयावर  दिसून येतात पुढे फेब्रुवारीअखेर पर्यंत ते मुक्काम ठोकतात.

देशी-विदेशी पक्षाचे आगमन संथगतीनेनाथसागराचा दागिणा म्हणून गौरविण्यात आलेला फ्लेमिंगो उर्फ रोहीत पक्षाचे आगमन अद्याप न झाल्याने पक्षिमित्र हिरमुसले आहेत. जलाशयावर दरवर्षी हजारोच्या संख्येने येणारी बदके, करकोचे, कुराव, सुरेय हे पक्षी दुर्मिळ झाले आहेत स्थानिक पक्षात  मुग्धबलक,चमचा, शराटी, सुरय, कूरव, शेकाट्या, धनवर बदक, पान कावळे, राखी सारंग,रंगीत करकोचे हे यंदा कमी संख्येने दिसून येत आहेत. तसेच वारकरी बदक,पाणकोंबडी, पानडुबी, पाणभिंग्री या पक्षाचे तर अद्याप दर्शन झालेले नाही. परदेशी पक्ष्यांमध्ये माळ भिंगरी, किरा, तुत्वार, पट्टेरी हंस, थापट्या बदक, मत्स्य गरुड, पायमोज गरुड, पान घार ,पानलावा, पान टीवळा हे पक्षी कमी संख्येने आले आहेत. क्रौंच पक्षी, तरंग बदक,चक्रांग बदक,तलवार बदक,भुवई बदक,हिरवा तूटवार हे सुध्दा जलाशयावर दिसले नाहीत. पक्षीप्रेमींसाठी हिवाळी पाहुण्यांचे पक्षी संमेलन म्हणजे पर्वणीच असते. बार हेडेड गुज, पिनटेल, पोचार्ड, जॅगवेल, सँड पायपर, ग्रीन शॅक, रेड शॅक, व्हॅगटेल, चक्रवाक अशा पक्ष्यांना टिपण्यासाठी छायाचित्रकार जायकवाडी पक्षीअभयारण्यात वेळ घालवतात यंदा मात्र पक्षांची आतुरतेने प्रतिक्षा करण्यात येत आहे. 

पक्षांच्या अधिवासावर अतिक्रमणजायकवाडी धरण १००% भरलेले असून लगतच्या गाळपेरा क्षेत्रात शेती होत असल्याने पक्षांना यंदा उतरण्यासाठी जागा राहिलेली नाही. शिवाय शेंद्रा औद्योगिक वसाहत, जालना पाणीपुरवठा योजनासहीत अनेक योजनाच्या ईमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामामुळे पक्ष्यांची बसण्याची हक्काची जागा हिरावली गेली आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत पक्षांचे आगमनगेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यासकांनी या बदलाची नोंद घेतली आहे. रशिया, उत्तर युरोप, मंगोलिया, कॅनडा, चीन आणि जपानच्या काही भागातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. पूर्वी जमिनीवर तीन फूटपर्यंत उंचीचे बर्फाचे थर पाहायला मिळायचे. आता त्यांची जाडी कमी झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे जगाच्या हवामानावर परिणाम होत आहे. यंदा डिसेंबर अखेरपर्यंत धरणावर पक्षाचे बऱ्यापैकी आगमन होईल अशी आशा आहे.  - पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादbirds sanctuaryपक्षी अभयारण्य