शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जागतिक मधुमेह दिन : मधुमेहासोबत लठ्ठपणावरही नियंत्रण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 15:55 IST

मधुमेहासोबत रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्ट्राॅलच्या व्याधींपैकी एक व्याधी जडलेली दिसून येते.

ठळक मुद्दे६० टक्के मधुमेहींत एकापेक्षा अधिक व्याधी

-   योगेश पायघन

औरंगाबाद : कोरोनाबाधितांत विषेशतः अति गंभीर, आजाराची गुंतागुंत आणि बाधित मृतांत मधुमेह असलेल्यांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. बदलती जीवनशैली आणि संतुलित आहार, व्यायाम, औषधोपचाराकडे दुर्लक्ष, वाढत्या लठ्ठपणामुळे मधुमेह रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरतोय. त्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहतज्ज्ञांशी लोकमतने संवाद साधला. जिल्ह्यात मधुमेहींच्या केलेल्या एका अभ्यासात ८०० मधुमहींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी ४८२ रुग्णांची रक्तातील शुगर नियंत्रणात नव्हती. तर सोबतच ५५ टक्के रुग्णांना रक्तदाब आणि ४० ते ४५ टक्के रुग्णांना लठ्ठपणा आढळून आला. तर ६० टक्के लोकांत मेटॅबाॅलिक सिन्ड्रोम होता. म्हणजे मधुमेहासोबत रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्ट्राॅलच्या व्याधींपैकी एक व्याधी जडलेली दिसून येते. याला प्रामुख्याने वजन वाढणे, दिलेले औषधोपचार वेळेवर न करणे, आहारातील पथ्य न पाळणे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष कारणीभूत आहे, असे मधुमेह व आंतरग्रंथीतज्ज्ञ डाॅ. नीलेश लोमटे यांनी सांगितले. 

मधुमेह येण्याआधी टाळा एकविसावे शतक मधुमेह व लठ्ठपणा असे डायबेसिटीचे युग आहे. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. पहिला शरीरात इन्सुलीनच्या हार्मोन्सची उत्पतीच होत नाही आणि दुसरा इन्सुलीनची उत्पत्ती होते; परंतु त्याची कार्यक्षमता कमी असते. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आता प्राैढच नव्हे तर लहान मुलांतही आढळून येत आहे. जगात चीननंतर भारतात सर्वाधिक मधुमह रुग्ण आहेत. ६९ दशलक्ष लोक मधुमेहग्रस्त आहेत. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वाढत जाणारा बालवयातील लठ्ठपणा आहे. बालवयातील लठ्ठपणामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्राैढांच्या तुलनेत बालमधुमेहींमध्ये दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आव्हानात्मक आणि हानिकारक आहे. त्यामुळे तो येण्याआधी टाळला पाहीजे, असे बालस्थूलतातज्ज्ञ डाॅ. प्रीती फटाले यांनी सांगितले.  

लठ्ठपणावर नियंत्रण गरजेचे सद्य:स्थितीत मधुमेहाचे प्रमाण १० टक्के आहे; पण त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. साठ टक्के मधुमेही रुग्णांना मेटॅबाॅलिक सिन्ड्रोम आहे. वाढते वजन त्याला कारणीभूत ठरताना दिसते. योग्य आहार, पथ्य, व्यायाम, नियमित औषधोपचार गरजेचा आहे. लठ्ठपणा वाढू न दिल्यास मधुमेहही नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. कोरोना काळात मधुमेह असलेल्या रुग्णांना संसर्ग होणार नाही यासाठी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या प्रतिबंधक उपाययोजनांकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष देण्याची आहे. - डॉ. नीलेश लोमटे, आंतरग्रंथी व मधुमेहतज्ज्ञ

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद