शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 03:25 IST

२२ ते २४ नोव्हेंबरला देश-विदेशांतून लाखो उपासक येणार

औरंगाबाद : दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये २२ ते २४ नोव्हेंबर या काळात जागतिक धम्म परिषद होत असून, तिलादेश-विदेशातून एक लाखांहून अधिक उपासक-उपासिका येणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष सदानंद महास्थवीर यांनी बुधवारी दिली.राज्याचे उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि थायलंडच्या उद्योजिका रोजना व्हॅनिच कांबळे यांच्या पुढाकारातून ही परिषद होत आहे.या परिषदेसाठी जपान, थायलंड, नेपाळ, चीन, कोरिया, मलेशिया, श्रीलंका, जपान, भूतान, ब्रह्मदेशांसह विविध देशांतून भिक्खू व बुद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक येणार आहेत. विदेशातील किमान १५० भिक्खू व देशातील ३०० भिक्खू परिषदेला हजर राहतील. श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा यांच्या हस्ते परिषदेचे शुक्रवारी उद्घाटन होईल. त्यावेळी १३ देशांतील प्रमुख भिक्खू, विचारवंत उपस्थित असतील.शनिवारी भिक्खूंसाठी होणाऱ्या सत्रास दलाई लामा मार्गदर्शन करतील. विदेशातून आलेले भिक्खू विचारांचे अदान-प्रदान करतील. रविवारी सकाळी दलाई लामा पीईएस मैदानावर जनसमुदायाला मार्गदर्शन करतील. परिषदेत अनेक परिसंवाद होणार आहेत. पत्रकार परिषदेस भदन्त विनय रखित्ता थेरो, भदन्त ज्ञानबोधी, डॉ. अरविंद गायकवाड, कस्टम मुंबईचे आयुक्त मेश्राम, निवृत्त सनदी अधिकारी आर. के. गायकवाड, कृष्णा भंडारे, यशंवत भंडारे, यशवंत कांबळे, राजेश काळे उपस्थित होते.पूर्वापार बौद्धभूमी आहे औरंगाबादऔरंगाबाद ही पूर्वापार बौद्धभूमी आहे. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांसह औरंगाबाद बुद्धलेणी, पितळखोरा बुद्धलेणी हे त्याचे प्रतीक आहे. या भूमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.ही कर्मभूमी जगाने पाहवी या उद्देशाने येथेच जागतिक धम्म परिषद भरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लोकुत्तरा महाविहारचे अध्यक्ष भदन्त बोधीपालो महाथेरो यांनी सांगितले.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामा