शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

World AIDS Day : निरोगी बाळाच्या जन्माने ‘एचआयव्ही’ग्रस्त मातांना नवजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 12:41 IST

World AIDS Day : नियमित औषधोपचार, सकस आहार आणि सकारात्मक विचाराचा परिणाम

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : एचआयव्ही, एड्स ( AIDS ) म्हटले की आजही नागरिक चार हात दूर राहतात, अनेकांना या आजारांच्या नावानेच घाम फुटतो. जिल्ह्यात जवळपास २० गरोदर मातांना ‘एचआयव्ही’चे निदान झाले, तेव्हा आपल्या बाळाला जन्मापासूनच नरकयातना भोगाव्या लागणार, या विचारानेच या महिला आणि त्यांची कुटुंबे गलितगात्र बनली. मात्र वेळेवर घेतलेल्या औषधोपचाराने या मातांनी ‘एचआयव्ही’मुक्त निरोगी बालकांना जन्म दिला (Rebirth of HIV-infected mothers with the birth of a healthy baby) . एकप्रकारे या बालकांनी मातांना नवे आयुष्य मिळाले.

असुरक्षित लैंगिक संबंध यासह इतर काही कारणांमुळे एचआयव्ही (एड्स) आजार होतो. या आजारावर प्रभावी आणि परिणामकारक औषधे मिळावीत यासाठी संशोधन सुरू आहे. यातूनच विविध प्रकारच्या गुणकारी औषधांचा शोध लागला आहे; परंतु तरीदेखील या आजारातून रुग्णाला पूर्णत: बरे करणारी औषधे अद्याप निर्माण झालेली नाहीत. मात्र, या औषधांनी रुग्णांचे आयुर्मान वाढविले हे मात्र निश्चित. गर्भवती महिला एचआयव्हीबाधित असेल, तर तिच्या बाळालाही या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अशा मातांना घाटी, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, इतकेच नव्हे, एआरटी सेंटर्सशी जोडून त्यांना एचआयव्हीला प्रतिकार करणारी औषधे सुरू करण्यात येतात.जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्त गरोदरमाता नियमित औषधोपचार घेतील, सकस आहार आणि सकारात्मक विचार ठेवतील याची काळजी घेतली जाते. औषधोपचार सुरू असतानाच गर्भवतीच्या आणि बाळाच्या सहावा आठवडा, सहावा महिना, बाराव्या आणि अठराव्या महिन्यात वेळोवेळी आवश्यक तपासण्या करून घेण्यात आल्या. यामध्ये २० गरोदर मातांची बाळे पूर्णत: निरोगी असल्याचे आढळून आले.

वेळेवर औषधोपचारजिल्ह्यात एचआयव्ही पाॅझिटिव्ह आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. एचआयव्हीग्रस्त गरोदर मातेपासून होणाऱ्या शिशूलाही एचआयव्ही होण्याचा धोका असतो. परंतु गेल्या वर्षभरात २० गरोदर मातांनी जन्म दिलेले शिशू एचआयव्ही निगेटिव्ह राहिले. वेळेवर औषधोपचार आणि पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.- संजय पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद