लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आॅनलाईन सेवा संथ गतीने सुरू असल्याने याचा परिणाम कामकाजावर होत आहे. यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांसह ग्राहकही त्रस्त झाले आहेत. येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला परिसरातील २५ गावे जोडली आहेत. सध्या शिक्षकांचे पगार, अंगणवाडी कार्यकर्तींची पगार, निराधारांचे मानधन, दुष्काळी अनुदान, पीक विमा वाटपाचे काम सुरू आहे. यामुळे बँकेमध्ये ग्राहक गर्दी करीत आहेत. परंतु, येथील बँकेतील इंटरनेट संथ गतीने सुरू आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. परिणामी कर्मचारी व ग्राहकांनाही याचा त्रास होत आहे. शाखेतील नेट मंद गतीने चालत असल्याने काम करण्यास अडचणी येत असल्याची माहिती शाखाधिकारी एन.के. रणबावळे यांनी दिली.
बँकेतील कामकाज संथ गतीने
By admin | Updated: June 23, 2017 23:34 IST