राजूर : शेतमजुरी करणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खामखेडा येथे ३१ मार्च रोजी घडली. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खामखेडा येथील दशरथ भिकाजी सिरसाठ (४०) हे गुरूवारच्या रात्रीपासून बेपत्ता होते. खामखेडा शिवारातील दिनकर मनोहर पवार यांच्या गट क्रमांक ८१ मधील शेतात एका झाडाला दशरथ सिरसाठ यांचा मृतदेह लटकलेला दिसून आला. ही माहिती कुटुंबियांना सांगितल्यानंतर लक्ष्मण भिकाजी सिरसाठ यांनी राजूर पोलिसांना माहिती दिली. यावरून जमादार विष्णू बुनगे, प्रताप चव्हाण, संतोष वाढेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत दशरथ सिरसाठ यांच्या मुलीचा पुढच्या आठवड्यात विवाह ठरलेला होता. ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भाग्वित होते. सिरसाठ यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा होती. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
खामखेडा येथे मजुराची आत्महत्या
By admin | Updated: April 1, 2017 00:25 IST