शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

औरंगाबादेत केजरीवाल यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची उडाली झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:07 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज भेटणे क ठीण झाले होते. एक तर झेड सुरक्षेचे कारण सांगितले जात होते. पोलिसांचे कडे कमी झाले म्हणून की काय, आम आदमी पार्टीच्या महिलांनी आणखी एक कडे तयार करून रस्ता अडवला. या महिला आम आदमी पार्टी, अशी अक्षरे असलेल्या टोप्या परिधान करून होत्या व त्या दिल्ली- मुंबईहून आलेल्या होत्या.

ठळक मुद्देकडक सुरक्षा : काही भेटले, अनेकांची मात्र झाली निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज भेटणे क ठीण झाले होते. एक तर झेड सुरक्षेचे कारण सांगितले जात होते. पोलिसांचे कडे कमी झाले म्हणून की काय, आम आदमी पार्टीच्या महिलांनी आणखी एक कडे तयार करून रस्ता अडवला. या महिला आम आदमी पार्टी, अशी अक्षरे असलेल्या टोप्या परिधान करून होत्या व त्या दिल्ली- मुंबईहून आलेल्या होत्या.रात्री ८.३० वाजता अरविंद केजरीवाल यांचे सुभेदारी गेस्ट हाऊसवर आगमन झाले. तत्पूर्वी, ते दिल्लीहून विमानाने चिकलठाणा विमानतळावर उतरले. आज रात्री सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम करून ते उद्या दि.१२ जानेवारी रोजी सकाळीच सिंदखेडराजाकडे रवाना होणार आहेत. तेथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला परवानगी देण्यावरूनही कवित्व रंगले होते. अखेर परवानगी मिळाल्यामुळे उद्या ही सभा होत आहे.या सभेच्या निमित्ताने आम आदमी पार्टीच्या महाराष्टÑाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी औरंगाबाद, जालना व सिंदखेडराजाचा दौरा केला होता. औरंगाबाद जिल्हा समन्वयक सुग्रीव मुंडे यांनी त्यांच्या सहकाºयांसह परिश्रम घेतले; पण आज केजरीवाल प्रत्यक्षात औरंगाबादला आले असताना कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना भेटणे दुरापास्त झाले. महिलांनी कडे करून रस्ता अडवल्यामुळे काही वेळ थांबून जयाजी सूर्यवंशी, गोपीनाथ वाघ यांच्यासारखे भेटायला आलेले कार्यकर्ते परत निघून गेले.आम्हाला सुभाष झंवर यांनी निरोप पाठवून केजरीवाल यांना भेटा असे सांगितले. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते घेऊन येथे आलो; पण येथे आल्यानंतर हा तमाशा पाहून नाराज झालो, असे उद्गार प्रा. फुलसिंग जाधव यांनी काढले. दरम्यान, प्राचार्य ग. ह. राठोड, प्रा. मोतीराज राठोड, राजपालसिंह राठोड व इतरांना भेटायला आत सोडून दिले. आम्ही आमच्या बंजारा समाजाच्या मागण्या केजरीवाल यांच्यासमोर मांडल्या, असे प्रा. राठोड यांनी सांगितले. भेट मिळण्यापूर्वी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला ‘जय सेवालाल’ अशा घोषणा द्याव्या लागल्या. नंतर हा कधी ‘भारत माता की जय’, तर ‘वंदे मातरम्’ असा घोषणांचा सिलसिला चालूच राहिला. फार तर शे-शंभर कार्यकर्ते भेटायला आलेले होते. त्यापैकी जालिंदर ढाकणे या कार्यकर्त्याने तर खूपच गोंधळ घातला. ‘मी आम आदमी पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे. रामलीला मैदनावर मी केजरीवाल यांच्याबरोबर उपोषण केले आहे. मला कोण अडवतंय बघू’, असे ढाकणे बोलू लागले; पण त्यांनाही भेटू दिले गेले नाही. शेवटी रात्री ९.३० वाजेदरम्यान पाच मिनिटांसाठी ते बाहेर आले. काही कार्यकर्त्यांचे बुके स्वीकारले आणि परत गेस्टहाऊसमध्ये गेले.मानसिंग पवार भेटीलाऔरंगाबादचे उद्योजक मानसिंग पवार यांची मात्र केजरीवाल यांच्यासमवेत निवांत भेट झाली. त्यावरून बाहेर तर्कवितर्क लढवले जात होते.