शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या आशेने कामगार गाठताहेत रेल्वेस्टेशन; परिसरातच राहतात बसून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:28 IST

रेल्वेस्टेशनच्या परिसरात ते आशाळभूत नजरेने पाहत होते, कोणीतरी येईल आणि आमची व्यवस्था करतील, असे त्यांना वाटत होते.

ठळक मुद्देकामगारांना गावी जाण्याची प्रतीक्षा अनेक कामगार उशिरा आल्याने हुकली रेल्वे

औरंगाबाद : पाठीवर बॅग, हातात अवजड गाठोडे घेऊन अनेक मजूर, कामगारांनी रविवारी रेल्वेस्टेशन गाठले. मात्र, येथून कोणतीही रेल्वे धावणार नसल्याचे कळताच अनेक जण निराश होऊन माघारी परतले, तर काही जण रेल्वेच्या आशेने परिसरातच बसून राहिले.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेक श्रमिक, कामगारांना गावी जाण्यास भाग पाडले. अनेक कामगारांनी गाव गाठण्यासाठी शेकडो कि.मी.चे अंतर पायीच कापले. रेल्वे रुळावरून गावाकडे पायी जाणाऱ्या श्रमिकांचा रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त झाली. शासनाने विविध राज्यांतील मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरूनही विविध राज्यांतील श्रमिकांना घेऊन रेल्वे रवाना झाल्या. त्यातून हजारो प्रवासी गावी रवाना झाले; परंतु अद्यापही अनेक कामगार गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रेल्वेने गावी जाता येईल, या आशेने रेल्वेस्टेशन गाठत आहेत.

बिहारला जाण्यासाठी काही कामगार रविवारी रेल्वेस्टेशन पोहोचले; परंतु बिहारची रेल्वे एक दिवसापूर्वीच रवाना झाल्याचे कळताच ते निराश झाले. रेल्वेस्टेशनच्या परिसरात ते आशाळभूत नजरेने पाहत होते, कोणीतरी येईल आणि आमची व्यवस्था करतील, असे त्यांना वाटत होते. यावेळी काहींनी बिहारमध्ये जायचे असून, पुण्यावरून आल्याचे सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, रविवारी रेल्वे नव्हती. आमच्यापर्यंत कोणताही कामगार आला नाही, असे त्यांनी सांगितले.

१ जूनपासून नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस१ जूनपासून नांदेड येथून नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस धावेल. तसेच दिनांक ३ जूनपासून अमृतसर येथून अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस धावेल. या गाडीस २२ बोगी असतील, यात सामान्य म्हणजेच जनरलचे डबे नसतील. या विशेष रेल्वेची वेळ नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेससारखीच असेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे