देवीदास विठ्ठल गरदे (वय ५४ वर्षे, रा. मेहेरनगरी, पिसादेवी), असे मृताचे नाव आहे. गरदे हे सिडको एमआयडीसीमधील गरवारे पॉलिस्टर कंपनीत कामगार होते. ३० नोव्हेंबर रोजी रात्रपाळीचे काम करून ते घरी गेले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले. मात्र, ते ना पुन्हा कामावर गेले, ना घरी परतले. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते रेल्वेच्या धडकेने मरण पावलेले आढळले. रुळावर त्यांचा मृतदेह होता. या घटनेची माहिती कुणीतरी त्यांचे साडू भुजंगराव हरिभाऊ सुरासे (रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना) आणि जावई सोमेश वसंतराव कोळी (रा. न्यायनगर) यांना मोबाइलवर दिली. त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आला. पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार पांढरे तपास करीत आहेत.
कामगाराची रेल्वेसमोर आत्महत्या
By | Updated: December 2, 2020 04:11 IST