शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कामे संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:05 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना असतानाही जिल्ह्यातील काही ठिकाणी कामांचे मूल्यमापन न करताच बिले अदा केल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देघोटाळ्याचे सिंचन: पाझर तलावाची कामे न होताच वाटप केला निधी

औरंगाबाद : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना असतानाही जिल्ह्यातील काही ठिकाणी कामांचे मूल्यमापन न करताच बिले अदा केल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. परिणामी योजनेतील कामे संशयाच्या भोवºयात आली आहेत. जिल्हा दुष्काळाच्या खाईत गेलेला असताना जलयुक्त शिवार, पाझर तलाव आणि सिमेंट नाला बंधाºयांच्या कामात गैरव्यवहार होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या सगळ्या प्रकरणातील दोषी कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यांवर मात्र कुठलीही कारवाई अद्यापपावेतो झालेली नाही.वैजापूर तालुक्यातील आलापूरवाडी, शिऊर गाव, कोल्ही, कोरडगाव, साफियाबादवाडी, शिरोडी, भादली, पारळा, नालेगाव, पानगव्हाण, मुंडवाडी, वडनेर, शिवगाव, हाजीपूरवाडी, बिबखेडा, भायगाव, शिवगाव, रोटेगाव, बाभूळतेल येथील पाझर तलावांची कामे न होताच बिले उचलण्यात आल्याचा संशय व्यक्त होतो आहे. उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी भौतिकदृष्ट्या सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याचे प्रमाणित केले आहे.१०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या गाव पाझर तलांवाकरिता सप्टेंबर महिन्यात शासनाने थकबाकी देण्याबाबत निधी दिला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. मृदू व जलंसधारण आयुक्त दीपक सिंगला यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करताना दक्षता घेण्यासाठी विशेष परिपत्रक जारी केले होते; परंतु त्याची पायमल्ली झाल्याचे दिसत आहे. २०१६ ते २०१८ पर्यंत ५८ कोटी रुपयांचा चुराडा पाझर तलाव सिंचनावर झालेला आहे. त्यातून किती सिंचन झाले, याबाबतची ठोस माहिती काही पुढे येत नाही. उलट गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, गंगापूर या तालुक्यांतील कामांची चौकशीची मागणी होत आहे.साडेबारा लाख गेले कुठेसोयगाव तालुक्यातील हळदा येथील पाझर तलावाचे काम पूर्ण होऊन त्याचे साडेबारा लाखांचे बिल अदा करण्यात आले. सविता मजूर सहकारी संस्थेने ते काम केले. पॅनकार्ड, टीडीएस, जीएसटी हे सगळे कररूपी सोपस्कार पार पडल्यानंतर ७९६३३२ या क्रमांकाचा धनादेश संस्थेला देण्यात आला; परंतु सदरील रक्कम या संस्थेच्या खात्यात जमा झाली नाही. शिवाय आॅगस्ट महिन्यात काम अर्धवट असल्याचे कनिष्ठ अभियंत्याने चौकशी करण्याचे आदेश लघुसिंचन कार्यकारी अभियंत्याने दिले. या सगळ्या प्रकारात साडेबारा लाख कुठे गेले याचे उत्तर मात्र मिळत नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पCrime Newsगुन्हेगारी