शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-धुळे महामार्गाचे काम अर्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:35 IST

धुळे-औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ साठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असली तरी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अनास्थेमुळे या महामार्गाच्या कामाची डेडलाईन हुकली आहे. मार्चअखेरची डेडलाईन हुकली असून, डिसेंबर २०१८ पर्यंतही रस्ता पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देडेडलाईन हुकली : सोलापूर ते येडशीपर्यंतचेच झाले काम; नाक्याला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : धुळे-औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ साठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असली तरी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अनास्थेमुळे या महामार्गाच्या कामाची डेडलाईन हुकली आहे. मार्चअखेरची डेडलाईन हुकली असून, डिसेंबर २०१८ पर्यंतही रस्ता पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसते आहे. औरंगाबाद ते धुळेपर्यंतच्या कामाचे टेंडर गेल्या महिन्यात अंतिम झाले आहे. तर सोलापूर ते येडशीपर्यंतचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, येडशी येथील टोलनाक्याला विरोध सुरू झाला आहे.मार्च २०१८ पर्यंत रस्ता पूर्ण होईल, असा दावा केला जात होता. आता डिसेंबरअखेर रस्ता पूर्ण होण्याचा दावा एनएचएआय करीत आहे. सोलापूर ते येडशीपर्यंत रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.त्यापुढील रस्त्याचे काम मंदगतीने सुरू आहे. येडशी ते औरंगाबाद या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी जवळपास संपूर्ण भूसंपादन होत आले आहे. रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याची अधिसूचना काढण्यात आल्यानंतर कंत्राटदार कंपनी कंपनीला टोल वसूल करण्याची मुभा मिळणार होती. परंतु ८० टक्के काम पूर्ण होण्यापूर्वीच येडशी येथे टोल उभारण्यात आला आहे. तेथील टोल वसुलीला विरोध सुरू झाला आहे.अपघातांचे प्रमाण वाढलेचौसाळा, मांजरसुंबा, बीड (बायपासचे काम जवळपास पूर्ण), शहागड, पाचोड, आडूळपर्यंतचे काम अर्धवट झालेले आहे. चौपदरी आणि कुठे वळण दिल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. झाल्टा, गांधेलीमार्गे वाल्मी ते करोडीमार्गे कन्नड ते धुळे या उर्वरित महामार्गाच्या कामाच्या निविदा मंजूर होऊन काम सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. येडशी ते औरंगाबाद या दुसºया टप्प्यामध्ये महसूल विभागाकडून बहुतांश भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. महामार्गातील ७०० पैकी ६६२ हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात आली आहे. जुन्या रस्त्यावर पूर्णत: खड्डे पडले असून, औरंगाबाद ते बीडपर्यंत महामार्गावरून प्रवास करताना अनेक अडचणी येत असल्याचे वाहनचालक आणि प्रवासी सांगतात.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादDhuleधुळे