शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिन : महिलेने केले रेल्वेचे सारथ्य; तिकीट तपासनीस, सुरक्षा अधिकारीही महिलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:07 IST

यंदा महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेतर्फे दिनांक १ मार्चपासून १० मार्चपर्यंत महिला गौरव मोहीम राबविली जात आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी नांदेड-औरंगाबाद विशेष रेल्वेचे सारथ्य महिलांच्या हाती देण्यात आले.निधी सिंग या महिला रेल्वेचालक असल्याचे कळताच सेल्फीसाठी गर्दी

औरंगाबाद : नांदेड-औरंगाबाद रेल्वे मार्गावर शुक्रवारी पहिल्यांदाच महिलेने रेल्वेचे सारथ्य केले. रेल्वेचालकासह या रेल्वेत तिकीट तपासनीस, ‘आरपीएफ ’ कर्मचारीही महिलाच होत्या. निमित्त होते येऊ घातलेल्या महिला दिनाचे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येणार आहे. यंदा महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेतर्फे दिनांक १ मार्चपासून १० मार्चपर्यंत महिला गौरव मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत शुक्रवारी नांदेड-औरंगाबाद विशेष रेल्वेचे सारथ्य महिलांच्या हाती देण्यात आले. वरिष्ठ पॉइंट्सन मधुबाई, सुनीता कुमारी यांनी या रेल्वेला झेंडी दाखविली, तर वरिष्ठ लोकोपायलट निधी सिंघ यांनी ही रेल्वे चालविली. तसेच वरिष्ठ तिकीट कलेक्टर मरियम, उज्ज्वला, वर्षा साळवे यांनी प्रवाशांकडे तिकीट तपासणीची जबाबदारी निभावली. रेल्वे सुरक्षा बलाच्या कॉन्स्टेबल आर.टी. वटाणे यांनी प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती. 

नांदेडहून रेल्वे रवाना झाल्यानंतर निधी सिंग यांचे विविध रेल्वेस्टेशनवर स्वागत करण्यात आले. नांदेड-औरंगाबाद रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच एक महिला रेल्वेचालक येत असल्याची माहिती रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे प्रत्येक जण या रेल्वेची आतुरतेने वाट बघत होता. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास या रेल्वेचे आगमन झाले. रेल्वेच्या इंजिनमधून निधी सिंघ उतरतल्या. याप्रसंगी स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर रेल्वेस्टेशनवरील नीलिमा ठाकरे, वर्षा साळवे, गायत्री गव्हाणे, राणी संजयकुमार, संगीता केळीकर आदी महिला कर्मचाऱ्यांनीही निधी सिंग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विजय दिवे, प्रेमसिंग आदी उपस्थित होते. 

‘सेल्फी’साठी गर्दीनिधी सिंघ या परतीच्या प्रवासात औरंगाबादहून नरसापूर एक्स्प्रेसने नांदेडकडे रवाना झाल्या. निधी सिंग या महिला रेल्वेचालक असल्याचे महिला प्रवासी, युवतींना लक्षात आले तेव्हा अनेकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWomenमहिलाAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनpassengerप्रवासी