शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special : पती सरपंच असताना पत्नीने घर सांभाळले; पत्नी सरपंच होताच पतीने सावरले : वंदना मनोहर नीळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:53 IST

एकमेकांच्या साथीने मिळाले हस्ता गावाला बळ!

- सुरेश चव्हाण

कन्नड (जि. औरंगाबाद) : सुखी संसारासाठी नवरा बायकोच ट्युनिंग जुळायला हवे. ते जुळले की, निम्मे काम सोपे होऊन जाते आणि बाईचे कर्तृत्व उजळून निघते. हस्ता येथील एका जोडप्याने हे सिद्ध करून दाखवलेय. आधी नवरा सरपंच, नंतर बायको; पण दोघांनीही कुटुंब, शेती सांभाळत गावाचा प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला. आधी पती सरपंच होते, नंतर मी; पण एकमेकांच्या पाठीशी उभे राहत आम्ही जबाबदाऱ्या स्वीकारल्या. या सगळ्या दगदगीत एकमेकांच्या साथीने सगळी आव्हाने पेलली आणि गावाचा विकास केला... सरपंच वंदना मनोहर नीळ यांची ही यशकथा!

बाईला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली की, ती सोने करते. वंदना नीळही त्यापैकी एक़ पती सरपंच असताना त्यांनी सासू, पती आणि दोन मुले, असे कुटुंब सांभाळले. सोबत शेतीची सगळी कामेही पाहिली.  डोंगराच्या कुशीत वसलेले हस्ता गाव. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १ हजार ७६७. जिल्हा परिषदेची इयत्ता सातवीपर्यंत शाळा. गावात दोन अंगणवाड्या. नऊ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत.

सरपंचपदापर्यंत कशा पोहोचल्या? हे सांगताना वंदना नीळ म्हणाल्या, ‘पती मनोहर नीळ सरपंच होते. ते गावातील कामात व्यस्त राहायचे. त्यामुळे माझ्यावर शेती आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी पडली. गावासाठी आपल्या हातूनही चांगली कामे व्हायला हवीत, असे सतत वाटत राहायचे.’ १९ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामपंचायतची बिनविरोध निवड झाली. ५ महिला आणि ४ सदस्य बिनविरोध निवडून आले. सरपंचपद सर्वसाधारण महिला पदासाठी राखीव होते. वंदना नीळ यांची बिनविरोध निवड झाली. नीळ म्हणाल्या की, मला मिळालेली ही संधी धक्कायदायक आणि आनंददायी होती. पुढे गावाच्या विकासासंदर्भाने काम करताना कुटुंब आणि शेतीसाठी कमी वेळ मिळायला लागला; पण पतीने शेती आणि कुटुंबाची जबाबदारी स्वत:वर घेतली. मुले शाळेत जातात. सकाळी त्यांचे पतीच आवरून घेतात. पती आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मला काम करायला जास्त वेळ मिळतोय. वंदना नीळ सांगत होत्या.

ग्रामस्थ, सदस्यांचे सहकार्यही मोलाचेपेव्हर ब्लॉक, न्हानी ड्रॉप जोडणीपासून ते गावशिवारात जलसंधारणाची कामे आता करीत आहे. या ग्रामविकासाच्या कामात ग्रामस्थ व सहकारी सदस्यांचे सहकार्यही तितकेच मोलाचे असल्याचे त्या सांगतात. 

गावाचे रूपडे बदललेमहिलांच्या ५ बचत गटांत ४ ने भर टाकली आणि त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज मिळवून दिले. दुग्धपालन, शेळीपालन, समूह शेती यांच्या माध्यमातून गटांनी उत्पन्न वाढवले. आणखी ५ गट तयार होत आहेत. गावात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. ड्रेनेजलाईन टाकण्यात आली. न्हानी ड्रॉप जोडणी देण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला नळाच्या पाण्याच्या दोन तोट्या देण्यात आल्या. एका नळातून सांडपाणी, तर दुसऱ्या तोटीतून आरओचे शुद्ध पाणी मिळणार आहे. या दोन्ही तोट्यांना मीटर बसविले जाणार आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येणार आहे. याशिवाय स्मशानभूमी सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापनसाठी ट्रॅक्टर खरेदी, कंपोस्ट खत खड्डे करण्यात आले आहेत. जलयुक्तमधून सुमारे २२ सिमेंट बंधारे बांधण्यात आली आहेत. गट शेती ही संकल्पना राबविली जात आहे, अशा विविध माध्यमांतून गावाचे रूपडे बदलले आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद