शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

‘एसटी’चे स्टिअरिंग हाती मिळविण्यासाठी महिला कर्मचारी एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:31 IST

थांबविलेले प्रशिक्षण पुन्हा सुरू करून विद्यावेतन देण्याची मागणी

ठळक मुद्देएसटी महामंडळात २०१९ मध्ये चालकपदी महिलांची नियुक्ती झाली. कोरोनाचे कारण पुढे करून अचानक प्रशिक्षण बंद करण्यात आले.

औरंगाबाद :  एसटी महामंडळात महिला चालकांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग मिळावे, यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीने संपूर्ण राज्यात अभियान चालू केले आहे.  महिलांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे विद्यावेतन देणे, त्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

एसटी महामंडळात २०१९ मध्ये चालकपदी महिलांची नियुक्ती झाली. एसटीचे स्टिअरिंग महिलांच्या हाती देण्यात येणार होते; परंतु कोरोनाचे कारण पुढे करून अचानक त्यांचे प्रशिक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे या चालक महिलांपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी ‘महिलांच्या हाती दिले जाणारे एसटीचे स्टिअरिंग केले जाम’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. 

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या निर्भया समितीच्या वतीने  संपूर्ण महाराष्ट्रातील निर्भयांनी म्हणजे महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठवून या महिलांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे उर्वरित विद्यावेतन देऊन सेवेत  सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात औरंगाबाद जिल्हा कामगार संघटना अध्यक्ष बाबासाहेब साळुंखे, सचिव राजेंद्र मोटे, अरुणा चिद्री,  युनिट  सचिव रवींद्र डाखोरकर,  प्रसिद्धी सचिव  राजेंद्र वाहटुळे,  कार्याध्यक्ष विजय पोफळे, उपाध्यक्ष साबेरा सिद्दीकी, नालंदा धीवर यांची नावे आहेत.

अभियान अधिक प्रखर करणारमाजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, नीलम गोºहे,  सुप्रिया सुळे यांनाही निवेदन पाठवून या महिलांना न्याय मिळवून देण्याचे अभियान अधिक प्रखर करण्यात येईल, असे शीला संजय नाईकवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद