शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

महिलांना पोस्टात सर्वाधिक व्याज; दोन महिन्यांत १३ कोटी रुपये गुंतविले

By साहेबराव हिवराळे | Updated: June 20, 2023 14:28 IST

एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या महिला सन्मान बचतपत्र योजनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने महिलांसाठी या आर्थिक वर्षापासून महिला सन्मान बचतपत्र योजना सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात १,७९७ महिलांनी १३ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पोस्टाने एक पर्वणीच आणली आहे.

एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या महिला सन्मान बचतपत्र योजनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही योजना पोस्टाने महिला व मुलींसाठी आणली आहे. बचतपत्राचा कालावधी दोन वर्षांचा असून, ७.५ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज दिल्याने परतावाही चांगला आहे. बँकेत दर तीन महिन्यांनी बचत खात्याला व्याज जोडले जाते.

एका महिलेला १,००० रुपयांपासून ते दाेन लाखांपर्यंतची बचत करता येते. ३२ हजार ४४ रुपयांचा परतावा त्यांना मिळणार आहे. महिलेच्या किंवा मुलीच्या वतीने तिचे पालक बचतपत्रही घेऊ शकतात. या महिलांसाठी टपाल खात्याने ही योजना आणून आर्थिक पाठबळच दिले आहे. एक वर्षानंतर काही अडचण अथवा आजारपण आल्यास ४० टक्के रक्कम एकदाच काढण्याची तरतूददेखील या योजनेत आहे.

काय आहे महिला बचतपत्र योजना?केंद्र सरकारने महिलांसाठी या आर्थिक वर्षापासून महिला सन्मान बचतपत्र योजना सुरू केली आहे. दोन वर्षांसाठीच ही योजना असून, इतर बँकांपेक्षा पोस्टात सर्वाधिक व्याजदर दिलेला आहे. त्याचा महिला योग्यपद्धतीने फायदा घेत आहेत.

जास्तीत जास्त दोन लाखांची गुंतवणूक

या योजनेत १,००० रुपयांपासून ते दाेन लाखांची गुंतवणूक एका महिलेला करता येते.अनेक महिला खातेही उघडता येतात; परंतु, त्यात तीन महिन्याचे अंतर असावे. एका गुंतवणुकीत दाेन लाखांची लिमिट आहे. दोन लाखांवर दोन वर्षांत ३२ हजार ४४ रुपयांचा परतावा ७.५ टक्के दराने व्याज दिले जात असल्याने दोन लाखांवर दोन वर्षांत ३२ हजार ४४ हजार रुपये तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळणार आहे.

दोन महिन्यांत १३ कोटींवर गुंतवणूक...जिल्ह्यात १,७९७ महिलांनी १३ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. पोस्टमनकडे अथवा कार्यालयात खाते उघडा महिलांमध्ये जनजागृती करण्यात येत असून बचत गटातील उद्योजक महिलांना या योजनेत जोडण्याचा अधिक प्रयत्न आहे. १,०१० खातेदार महिला जोडल्या गेल्या असून गती वाढलेली आहे. नजीकच्या पोस्टात जाऊन महिला सन्मान बचतपत्र घेता येते.- शहादेव सातपुते, पोस्टाचे व्यवसाय अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPost Officeपोस्ट ऑफिस