शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
2
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
3
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
4
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...
5
नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या संशय, रस्त्यात गाठून इतकं मारलं की, तरुणाचा जीवच गेला
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिवस फिरले, आधीच कर्जात असलेल्या पाकिस्तानने मोठी कंपनी काढली विकायला!
7
Video: भरमैदानात बाचाबाची अन् हाणामारी! एकाने खेचलं हेल्मेट तर दुसऱ्याने चक्क बॅटने...
8
सीआरपीएफ जवान निघाला पाकिस्तानचा हेर, NIA ने केली अटक; पाकच्या अधिकाऱ्याला माहिती पुरवणारा तो कोण?
9
कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी, पाचा आरोपी झाले फरार  
10
मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?
11
Social Viral: 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावरचा आत्तार्यंतचा अफलातून रील; बघाल तर चक्रावून जाल!
12
Corona Virus : गर्भातील बाळासाठी किती धोकादायक असू शकतो कोरोनाचा नवा व्हेरियंट?
13
Upcoming Cars : भारतात जून महिन्यात लॉन्च होतायत या 5 जबरदस्त कार, इलेक्ट्रिक कारचाही समावेश
14
12th Pass Job: बारावी पास उमेदवारांसाठी महानगरपालिकेत नोकरी, दरमहा ७५ हजार पगार!
15
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
16
ऑस्ट्रेलियात पाठवण्याचं आमिष दाखवून फसवणूक, तीन भारतीय तरुणांचं इराणमधून अपहरण, कुटुंबीयांकडे मागितली खंडणी  
17
ठाकरे गटाकडून  मुंबईकरांशी एक लाख कोटींची बेईमानी, आशिष शेलार यांचा थेट आरोप
18
June Astro 2025: जूनमध्ये बुधादित्य राजयोगात 'या' पाच राशींचे नशीब झळकणार, आर्थिक अडचणी दूर होणार!
19
"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
20
अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण

रसायनाच्या स्फोटात महिला ठार

By admin | Updated: August 19, 2016 01:05 IST

औरंगाबाद : चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्ती येथे फायबर दरवाजे आणि कूलरच्या बंद पडलेल्या कारखान्यात केमिकलच्या कॅनीचा भीषण स्फोट झाला.

औरंगाबाद : चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्ती येथे फायबर दरवाजे आणि कूलरच्या बंद पडलेल्या कारखान्यात केमिकलच्या कॅनीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात कारखान्याची मालकीण जागीच ठार झाली. स्फोट एवढा भीषण होता की, मृत महिलेल्या शरीराच्या चिंधड्या आणि रक्त-मांसाचे तुकडे संपूर्ण वर्कशॉपमध्ये उडाले. ही घटना गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. मीरा ज्ञानेश्वर रुद्राके (४६,रा. नवपुते वस्ती, चिकलठाणा शिवार) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पती, मुलगा अविनाश आणि अक्षय, मुलगी सायली आणि सून मनीषा यांच्यासह नवपुते वस्ती येथे राहत. १८०० चौरस फूट क्षेत्रफळाचा त्यांचा भूखंड आहे. यापैकी सहाशे चौरस फुटांवर त्यांचे पत्र्याचे घर असून बाराशे चौरस फुटावर कूलर आणि फायबर दरवाजे बनविण्याचा कारखाना होता. २००६ ते २०१२ पर्यंत त्यांचा हा कारखाना सुरू होता. त्यानंतर त्यांनी हा कारखाना बंद करून वेल्डिंग वर्कशॉप सुरू केले. हे वर्कशॉप बीड बायपास परिसरातील माऊलीनगर येथे आहे. बंद पडलेल्या कारखान्याशेजारीच त्यांनी बांधलेल्या घरात रूद्राके कुटुंब अडीच महिन्यांपूर्वी राहण्यास गेले. राखी पौर्णिमा असल्यामुळे त्यांचे पती ज्ञानेश्वर आणि मुलगा अविनाश हे मोटारसायकलने सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेवासा येथे राहणाऱ्या चुलत बहिणीकडे गेले होते. त्यामुळे घरी मीरा, मोठा मुलगा अक्षय, मुलगी सायली आणि सून मनीषा होते. मीरा या भिंतीला लागून असलेल्या चोहोबाजूने लोखंडी पत्रे लावलेल्या जुन्या कारखान्यात गेल्या. तेथे त्या काही तरी काम करीत असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात मीराबाईच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.केमिकल स्फोटाची दुसरी घटनाकेमिकलच्या स्फोटात सामान्यांचे बळी जाण्याची एक महिन्यातील ही दुसरी घटना आहे. सातारा परिसरातील एका बिल्डरकडे काम करणाऱ्या वॉचमनच्या घरात ११ जुलै रोजी रात्री रंगकामासाठी वापरण्यात येणाऱ्या थीनर या केमिकलचा स्फोट झाला होता. या स्फोटात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला तर तीन जण भाजले होते. घरातील अन्य सदस्य बालंबाल बचावलेस्फ ोटामुळे घटनास्थळावरील वस्तू जोराने उडाल्याने शेडला लावण्यात आलेले काही पत्रे तुटले तर काही वाकडे झाले. एका पत्र्याला दगड अथवा लोखंडी वस्तू जोरात आदळून आरपार गेल्याने त्याला मोठे भगदाड पडले होते. डाव्या बाजूला त्यांच्या घराची भिंत असल्याने त्या खोलीतील कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे ते बालंबाल बचावले. कारखान्याशेजारी राहणारे अन्य रहिवासीही या घटनेने हादरले.पॉलिस्टर केमिकलचा स्फोट?घटनास्थळी पाच ते सहा वर्षांपासून विविध केमिकल्सच्या कॅनी पडलेल्या होत्या. त्यामुळे हा स्फोट कोणत्या केमिकल्सच्या कॅनीमुळे झाला, हे तपासणीअंती स्पष्ट होईल असे फॉरेन्सिक सायन्सच्या तज्ज्ञांनी सांगितले. मात्र तेथे सर्वाधिक कॅन्स या फायबर कूलर बनिवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉलिस्टर (रेजिन) या केमिकल्सच्या असल्याची माहिती मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. भयाण दृश्याने कुटुंबियांना धक्काहा स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटाचा आवाज परिसरातील दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत गेला होता. अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने परिसर दणाणला. काय झाले अशी चर्चा नागरिक करीत होते. ४शेजारील आतल्या खोलीत असलेले त्यांचा मुलगा, सून आणि मुलगी हे धावतच कारखान्याकडे गेले. तेव्हा सुन्न करणारे दृश्य पाहून त्यांना चक्करच आली. ४मीरा यांच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीराच्या चिंधड्या होऊन त्या कोसळलेल्या होत्या. त्यानंतर प्रवासात असलेल्या वडील आणि भावाला अक्षयने फोन करून बोलावून घेतले.