शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"छत्रपती संभाजीनगरातील महिला पाकिस्तानची गुप्तहेर"; ई-मेलने तपास यंत्रणा हादरल्या

By सुमित डोळे | Updated: August 30, 2023 19:28 IST

छत्रपती संभाजीनगरातील या महिलेने आधी सौदी अरेबिया व नंतर काही महिने लिबियामध्ये प्रियकरासोबत वास्तव्य केले.

छत्रपती संभाजीनगर : मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाच्या पत्नीला पाकिस्तानच्या तरुणाने पळवून नेले. तिचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभागाचा संशय असल्याचा ई-मेल तपास यंत्रणांना प्राप्त झाल्यानंतर मात्र सारे अधिकारी हादरले.

या महिलेने आधी सौदी अरेबिया व नंतर काही महिने लिबियामध्ये प्रियकरासोबत वास्तव्य केले. तिच्या पाकिस्तानमधील वास्तव्याविषयी तर्कवितर्क सुरू असून, काही दिवस तिने पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये वास्तव्य केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आहे.

सिडको परिसरातील उच्चभ्रू कुटुंबातील ३४ वर्षीय साहिना (नाव बदलले आहे) डिसेंबरमध्ये बेपत्ता झाली. त्याच्या काही महिन्यांनंतर तिने पाकिस्तानच्या तरुणासोबत लग्न केल्याचे छायाचित्र व मेसेज पतीला प्राप्त झाले. ३ ऑगस्ट रोजी साहिना अचानक देशात परतली. मात्र, परतल्यानंतर ती देशविरोधी संघटना आयएसआयच्या संपर्कात आल्याचा ई-मेल तपास यंत्रणांना प्राप्त झाल्यानंतर हलकल्लोळ उडाला. गुप्तचर विभागाने याची गंभीर दखल घेतली. हा ई-मेल सर्वात आधी सीआयएसएफ, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्राप्त झाला होता.

संपर्क करणारा प्रियकराचा भाऊ ?साहिना बेपत्ता झाल्यानंतर काही महिन्यांतच तिच्या कुटुंबाशी पाकिस्तानच्या प्रियकराच्या वतीने अज्ञातांनी संपर्क साधला होता. साहिनासोबतचे छायाचित्र व उर्दू भाषेतले लग्नाचे प्रमाणपत्र पाठवल्याचे सांगण्यात आले. त्या दरम्यान प्रियकराच्या अली नामक भावाने कुटुंबाशी प्रथम संपर्क साधला होता, असेही सांगण्यात येत आहे.

अद्याप देशविरोधी कृत्याचा पुरावा नाहीनऊ दिवसांपासून याप्रकरणी एटीएस, राज्य सायबर सेल व इतर गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अद्याप महिलेच्या देशविरोधी कृत्यासंदर्भात कुठलाही सहभाग स्पष्ट झालेला नाही. याबाबत इतर यंत्रणांच्या समन्वयाने गांभीर्याने तपास सुरू असून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध, साहिनाच्या प्रवासाचे मार्ग व ठिकाणे जाणून घेणे, तांत्रिकदृष्ट्या ते सिध्द होणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद