शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात महिला उमेदवारांचा ‘डंका’; तीन प्रभागांत ३७ रणरागिणी आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:25 IST

२८ अ (अनुसूचित जाती महिला) या प्रभागात एकूण १२ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिला उमेदवारांनी मोठे वर्चस्व निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १६ क, २८ अ आणि २६ अ या तीन प्रभागांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, येथे सर्वाधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. या तीन प्रभागांत मिळून तब्बल ३७ महिला उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक २६ 'अ' (अनुसूचित जाती महिला) मध्ये सर्वाधिक १४ महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे, येथे एमआयएमवगळता सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार दिले. पक्षाच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी येथे ७ अपक्ष महिला उमेदवारांनीही कंबर कसली आहे, ज्यामुळे येथील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

-२८ मध्ये १२ महिला२८ अ (अनुसूचित जाती महिला) या प्रभागात एकूण १२ महिला उमेदवार रिंगणात आहेत. सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह ४ अपक्ष महिला निवडणूक लढवत आहेत. प्रभाग १६ 'क' (सर्वसाधारण महिला) या प्रभागात ११ महिला उमेदवार असून, सर्व पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त ५ अपक्ष महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी (शरद पवार) आणि वंचित बहुजन आघाडीला आपला उमेदवार उभा करता आलेला नाही.

सर्वपक्षीयांसमोर अपक्षांचे आव्हानया तिन्ही प्रभागांमध्ये भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि एमआयएम यांसारख्या दिग्गज पक्षांनी आपले तगडे उमेदवार दिले. मात्र, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर अपक्ष महिला उमेदवारांनी उभे केलेले आव्हान दुर्लक्षित करून चालणार नाही. तिन्ही प्रभागांत मिळून एकूण १६ अपक्ष महिला उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Women Dominate छत्रपती संभाजीनगर Elections; 37 Candidates Face-Off in Three Wards

Web Summary : छत्रपती संभाजीनगर elections see strong female presence. Three wards witness 37 women candidates from major parties and independents vying for victory, making the contest intense.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६