मुखेड : एका अनोळखी महिलेचा गळा चिरुन तिला मारहाण करुन जाळण्याचा प्रयत्न करीत खून केल्याची घटना मुखेड तालुक्यातील मंग्याळ शिवारात १५ आॅगस्ट रोजी उघडकीस आली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंग्याळ - देवला तांडा रस्त्यावर १५ आॅगस्ट रोजी मध्यरात्री एका विवाहित अनोळखी महिलेला मारहाण करुन तिचा गळा कापून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिला २० ते २५ वयोगटाची असून अंगावर पांढऱ्या रंगाची पिवळसर साडी, गुलाबी रंगाचे ब्लाऊज, गळ्यात लिंग व रुद्राक्षाची माळा, पायात जोडवे असून चेहरा गोल व रंग गोरा आहे.कामजळगा येथील पोलिस पाटील रामराव आनंदराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिसांत अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन इंद्राळे हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
महिलेचा खून करुन प्रेत जाळले
By admin | Updated: August 17, 2015 00:12 IST