देगलूर : तालुक्यातील खानापूर येथील नृसिंह सहकारी सूतगिरणीच्या मशीनमध्ये अडकून सफाई काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला़ ३ मार्च रोजी सकाळी ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली़गंगाबाई अशोक लाळे (वय ४०, राख़ानापूर) असे या महिलेचे नाव असून नृसिंह सूत गिरणीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात साफसफाईचे काम करीत असे़ साफसफाई दरम्यान तेथील चालू असलेल्या मशीनमध्ये हात गेला आणि यातून ही दुर्घटना झाली़पोलिस यंत्रणेला याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी घटनास्थळी भेट दिली़ मयत गंगाबाई लाळे हिच्या पार्थिवाची येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली़ हे वृत्त लिहिपर्यंत देगलूर पोलिस ठाण्यात या घटनेसंदर्भात कोणतीच तक्रार दाखल झाली नव्हती़ (वार्ताहर)
मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू
By admin | Updated: March 4, 2016 00:08 IST