शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चांगली टीम घेऊन शहर विकासात पुढे नेऊ; मनपा प्रशासक अभिजित चौधरींनी स्वीकारला पदभार

By मुजीब देवणीकर | Updated: August 2, 2022 12:58 IST

शहराच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना प्राधान्याने सोडविण्यात येतील 

औरंगाबाद: महापालिका प्रशासक म्हणून डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय मंडळींना सोबत घेऊन शहरास विकासात पुढे नेऊ अशी ग्वाही प्रशासक चौधरी यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले, आस्तिककुमार पांडेय यांच्या कार्यकाळात विकासाचा जो पाया रचला गेला त्यावर कळस चढविण्याचे काम यापुढे करण्यात येईल. शहराच्या गरजा ओळखून त्यावर तत्काळ काम करण्यात येईल. सोयीसुविधा देण्यात काही अडचणी असतील त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच औरंगाबादकरांना आगामी काळात सर्व सेवासुचिधा चांगल्या पद्धतीने देण्यात येतील,असेही चौधरी यावेळी म्हणाले.

महापालिकेचे नवीन प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी सोमवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. कार्यालयीन वेळेत ते न येऊ शकल्यामुळे मंगळवारी सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. राज्य शासनाने महापालिकेचे प्रशासक म्हणून सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांची मागील आठवड्यात बदली केली, तसेच आस्तिककुमार पाण्डेय यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. चौधरी गेल्या आठवड्यातच औरंगाबादला येणार असल्याची चर्चा होती, पण त्यांच्या जागी बदलून आलेले डॉ.राजा दयानिधी हे वेळेत आले नाहीत. त्यामुळे त्यांना पदभार घेण्यास उशीर झाला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका