शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डायन महागाई; तूर, मुगडाळ पुन्हा शंभरीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 13:13 IST

आयात कमी झाल्याने व मागणी वाढत असल्याने डाळीचे भाव वधारल्या

ठळक मुद्देआयात कमी झाल्याचा परिणाम

औरंगाबाद : ग्राहक जेव्हा दुकानदारांकडून तूर डाळीचा भाव ऐकतात तेव्हा त्यांचे डोळे पांढरे होत आहेत. कारण, तूरडाळीचे भाव पुन्हा एकदा शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचे परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने दिसायला लागले आहेत.

तूरडाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये वाढ होऊन सध्या ९२०० ते ९५०० रुपये क्विंटल विकते आहे तर किरकोळ विक्रीत ९५ ते ९८ रुपये किलोने तूरडाळ ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे.

तूरडाळीपाठोपाठ मूगडाळचे भाव २०० ते ३०० रुपयांनी वधारून ९००० ते ९५०० रुपये क्विंटल विकत आहे. ही डाळ ९४ ते ९७ रुपये किलोने विकत आहे. या दोन्ही डाळी महागल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

उडीद डाळही ८००० ते ८५०० रुपये तर मसूरडाळ ७००० ते ७५०० रुपये क्विंटल विकली जात आहे.

ग्राहकांना थोडा दिलासा म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या हरभराडाळीचे भाव ५२०० ते ५५०० रुपयांवर स्थिर आहेत.

आयात कमी झाल्याने व मागणी वाढत असल्याने डाळीचे भाव वधारल्याचे होलसेल व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले. या डाळी महागल्याने महिन्याचे बजेट बिघडल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करत आहे.

व्यापाऱ्यांचाच फायदातुरीचा हमीभाव ६००० रुपये आहे. ७० टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर ५००० ते ५५०० रुपये प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांना विकली. आता मोठे व्यापारी, कंपन्यांकडे तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आता तूर ६९०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. हमीभावापेक्षा जास्त किमतीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे.- हरिष पवार, अडत व्यापारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार