शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निलंबन केल्यानंतरच कळणार का?; मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना तंबी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:58 IST

ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचे विभागप्रमुखांकडील अधिकार काढून घेत स्वत:कडे घेतले.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून रस्त्यांच्या कामांचा निव्वळ ड्रामा का चालू आहेसर्व ३० रस्त्यांच्या कामांसाठी १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत

औरंगाबाद : महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबन केल्यानंतरच काही गोष्टी कळणार असतील, तर मी निलंबन करतो. रस्त्यांच्या कामांसाठी सहा महिन्यांपासून निव्वळ ‘ड्रामा’ सुरू आहे, अशा शब्दांत नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. समृद्धी महामार्गाचे काम बघा, कसे झपाट्याने सुरू आहे. शहरातील ३० कि.मी.चे रस्ते तुमच्याकडून होत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचे विभागप्रमुखांकडील अधिकार काढून घेत स्वत:कडे घेतले.

महापालिका आयुक्तांनी बुधवारी समर्थनगर वॉर्डात पाहणी केली. १०० कोटींमधील रस्त्याचे काम या भागात सुरू होते. कंत्राटदाराने रस्ता अर्धवट करून सोडला आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. कंत्राटदाराने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे आयुक्तांचा पारा चढला. आयुक्तांनी याबाबत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा वाहतुकीच्या अडचणीमुळे रस्त्याचे काम करता येत नसल्याचा खुलासा केला.

कामाला एवढे दिवस का लागतात. समृद्धीचे किती किलोमिटर होते ते बघा. दिवसाला पाचशे मीटर काम तुम्ही करू शकत नाही का, असा प्रश्न आयुक्तांनी उपस्थित केला. यावर अधिकारी खाली मान घालून उभे होते, तसेच मी तुम्हाला सर्व ३० रस्त्यांच्या कामांसाठी १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे. ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची अजिबात गरज नाही, मुदतवाढ देण्याचे विभागप्रमुखांकडील अधिकार काढून घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे आता हे अधिकार आयुक्तांनाच असणार आहेत. यावेळी शहर अभियंता एस.डी. पानझडे, उपायुक्त रवींद्र निकम, प्रभारी कार्यकारी अभियंता आर.एम. संधा, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, नगररचना सहायक संचालक रामचंद्र महाजन, सहायक आयुक्त करणकुमार चव्हाण, उद्यान अधीक्षक विजय पाटील, आय.बी. खाजा, संजय कोंबळे, घनकचरा विभागप्रमुख नंदकुमार भोंबे आदी उपस्थित होते.

व्हीआरएस घ्यासर्वच सिमेंट रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. आयुक्तांनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना फैलावर घेतले. कोल्हे यांनी वेगवेगळी कारणे देण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी तुम्हाला आरोग्याचा त्रास असेल, तर व्हीआरएस घेऊन घरी बसा, जागा खाली करा, असे नमूद केले.

निकम यांचीही खरडपट्टीमहापालिका आयुक्तांना समर्थनगर भागात ठिकठिकाणी गंभीर नागरी प्रश्न दिसून आले. याबद्दल त्यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडे विचारणा केली; परंतु त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे आयुक्तांनी निकम यांचीही खरडपट्टी काढली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा