शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटीतील रस्तेही ‘धडधड’करणारे होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:43 IST

औरंगाबाद : महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते औरंगाबादकरांना दिलासा देणारे नव्हे तर त्रासदायक ठरत आहेत. ...

ठळक मुद्देनिकष धाब्यावर : आतापर्यंत मनपाने तयार केलेले रस्ते सदोषच

औरंगाबाद : महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते औरंगाबादकरांना दिलासा देणारे नव्हे तर त्रासदायक ठरत आहेत. मनपाच्या प्रत्येक सिमेंट रस्त्यावर वाहन ‘धडधड’करते. रस्ते शंभर टक्के गुळगुळीत करणारी अत्याधुनिक ‘फिक्स फार्म काँक्रीट पॉवर’ मशीन आजपर्यंत वापरण्यातच आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने १०० कोटींच्या रस्त्यांमध्ये प्रत्येक कंत्राटदाराला या मशीनची सक्ती केली आहे. विशेष बाब म्हणजे एकाही कंत्राटदाराने मशीन खरेदी केलेली नाही.महाराष्टÑ शासनाने २०१४ मध्ये शहरातील सहा रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपये दिले. त्यापूर्वी मनपाने ३० कोटी रुपये खर्च करून क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता तयार केला. याशिवाय महापालिकेने शहरातील अनेक भागांत ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंतचे रस्ते तयार केले. प्रत्येक रस्त्यावर आज वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुचाकी असो किंवा चारचाकी वाहन; धडधड अटळ आहे. सर्व निकष धाब्यावर बसवून महापालिका रस्ते तयार करीत आहे. सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर, पुंडलिकनगर रोड, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन आदी अनेक रस्त्यांवर लहान खड्डे आहेत.महाराष्टÑ शासनाने जून २०१७ मध्ये शहरातील ३० रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी निधी दिला आहे. या रस्त्यांची कामे आता सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३ जानेवारीला रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन टीव्ही सेंटर येथे करण्यात आले होते. ही कामेही गुळगुळीत सिमेंट रस्त्यांच्या नावावर धडधड करणारी असतील का? असा प्रश्न औरंगाबादकर उपस्थित करीत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.‘फिक्स फार्म काँक्रीट पॉवर’ मशीनचा वापरच नाहीआरएमसी प्लँटमधून सिमेंट काँक्रीट रस्ते साईडवर येतात. दोन्ही बाजूने आडव्या लावलेल्या लोखंडी खांबाच्या आतील भागात सिमेंट काँक्रीट टाकण्यात येते. ३० अंश सेल्सिअस तापमानातच हे काम करायला हवे. जास्त उष्णता असेल तर रस्त्याला तडे जाण्याची दाट शक्यता असते. सिमेंट काँक्रीटची लेव्हल कर्मचारी लावून केल्या जाते. ही पद्धत चुकीची आहे. काँक्रीट दाबण्यासाठी आणि रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी ‘फिक्स फार्म काँक्रीट पॉवर’ मशीन आवश्यक आहे. याचा वापरच आजपर्यंत महापालिकेने केलेला नाही. त्यामुळे प्रत्येक रस्ता धडधड करणारा तयार होत आहे.अटी-शर्तींमध्ये मशीनचा समावेश१०० कोटींच्या निविदा प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने ‘फिक्स फार्म काँक्रीट पॉवर’ मशीन अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. मनपाने १०० कोटींची कामे चार कंत्राटदारांना दिली आहेत. परंतु कंत्राटदारांनी हे मशीन खरेदी केलेले नाही. एका कंत्राटदाराने खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी काही कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावर मशीन आणली होती. पैठण रोडचे काम करताना या अत्याधुनिक मशीनचा वापर करण्यात आला होता.दोन पर्याय दिले आहेत१०० कोटीतील कामे करताना कंत्राटदारांना फिक्स फार्म किंवा स्लीप फॉर्म पद्धतीच्या मशीनचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. या मशीन व्हायब्रेटरप्रमाणे काम करतात. रस्ता जास्तीत जास्त गुळगुळीत कसा होईल यादृष्टीने काम करून घेण्यात येणार आहे.एम. बी. काझी, कार्यकारी अभियंता---------

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका