शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'पैशांचा पाऊस पाडतो'; हैद्राबादच्या दोघांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला बीडमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 15:43 IST

पैसे मिळताच बाबाने रचलेल्या योजनेनुसार हैदराबादच्या दोघांची फसवणूक केली होती.

औरंगाबाद : पैशांचा पाऊस पाडतो  ५ ते ७ करोड रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या दोघांना साडेआठ लाखांना गंडा घालून पसार झालेल्या नारेगावातील भोंदूबाबा साहेबखा पठाण यास सिडको पोलिसांनी बीडमध्ये बुधवारी अटक केली आहे. 

मे महिन्यात सिडकोत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी भोंदूबाबाची गाडीही जप्त केली होती़ मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होणाऱ्या साहेब खान यासीन खान पठाण ऊर्फ सत्तार बाबाला अखेर बीड येथून सिडको पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी  यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या टीमला फरार आरोपीची खबर मिळाली होती. अधिक माहिती अशी की,  डोडू सत्यनारायण (रा. न्यू एलबी नगर, मेन रोड, हैदराबाद) आणि सय्यद जहाँगीर सय्यद अब्दुल खादब (रा. मौलाअली, हैदराबाद) यांची हजारी सुरेश खत्री (रा. धुलपेठ, हैदराबाद) यांच्याशी मैत्री आहे. खत्रीने तीन वर्षांपूर्वी नारेगावच्या सत्तार बाबाशी फोनवरून बोलणे करून दिले होते. तसेच, बाबा खूप करामती आहे. सर्व गरिबी, अडचणी दूर करून देतील. पण, औषधाला २५ लाख रुपये लागतील, असे सांगितले होते.

१७ फेब्रुवारीला सत्तार बाबाने डोडू आणि सय्यद जहाँगीर यांना भेटण्यासाठी बोलावले. २५ लाख नाही तर किती पैसे देऊ शकता, असे त्यांच्यात बोलणे झाले. त्यानुसार तात्काळ म्हणून २ लाख देण्याचे ठरले. त्यानंतर रमजान महिना लागल्यानंतर मी काम करू शकत नाही. त्यामुळे लवकर पैसे घेऊन या, असे सत्तार बाबाने सांगितल्यामुळे हैदराबादच्या दोघांनीही सोने गहाण टाकून ६.५० लाख रुपये जमविले. ४ मे रोजी ते देण्यासाठी दोघेही औरंगाबादला आले. त्यांची लॉजवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दुपारी ४ वाजता सत्तार बाबा स्वत:च्या कारने लॉजवर आला. त्याने ६़५०लाख रुपये आणि दोन चेक घेतल्यानंतर हैदराबादला जाण्याचे ठरविले. ते बीडमार्गे हैदराबादला जात असताना लातूर रोडला लागल्यावर अनोळखी इसमाकडून विधीच्या साहित्यासाठी पैसे दिले. पैसे मिळताच बाबाने रचलेल्या योजनेनुसार हैदराबादच्या दोघांची फसवणूक केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक