शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

भाजपला दिशा दाखविणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 11:32 IST

मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या कानपिचक्या  

ठळक मुद्देबढत्या आणि बदल्यांच्या कामांचे कंत्राट घेऊन येऊ नका  सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी आणि  पक्षासाठी करा

औरंगाबाद : हिंदुत्वाची दिशा आपण त्यांना  (भाजपचे नाव न घेता) दाखविली. मात्र, त्यांनी आपलाच घात केला. आता त्यांना त्यांची दिशा दाखविण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिला. ठाकरे यांच्या दोनदिवसीय मराठवाडा दौऱ्याचा समारोप शुक्रवारी एका हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने झाला.

राज्यात सत्तेत आलो म्हणून बढत्या आणि बदल्यांचे कंत्राट घेऊन माझ्याकडे येऊ नका, असा इशाराही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी आणि  पक्षासाठी करा,  असेही ठाकरे म्हणाले.  बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, रो.ह.यो.मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,  महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.

याबैठकीत ठाकरे म्हणाले की, ते बुद्धिबळाची भाषा करीत असतील तर मी पण फुटबॉल खेळणार नाही. ज्यांना मित्र मानले त्यांनी घात केल्याने दिशा बदलावी लागली. आघाडीसोबत जावे की न जावे हा मोठा प्रश्न होता. एका बाजूला विषारी साखर तर दुसरीकडे फक्त विष असेल तर निर्णय काय घ्यावा? महादेवानेही हलाल पचविलेच होते, आपणही मर्द आहोत, ते पचवू या. या सगळ्या घडामोडींचा अर्थ हिंदुत्व सोडले असा होत नाही. हिंदुत्व आणि हातातला भगवा सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

खुर्चीवरून चिमटा राज्यमंत्री अब्दुल सत्तार बैठकीला थोडे उशिरा आले. ते आले तेव्हा ठाकरे यांचे भाषण सुरू होते. कार्यकर्त्यांनी सत्तारांसाठी खुर्ची मिळावी यासाठी धावपळ केली. त्या धावपळीकडे ठाकरे यांचे लक्ष जाताच त्यांनी खैरे यांच्याकडे पाहत ते म्हणाले, जी रिकामी असेल ती खुर्ची घ्या आणि बसा. खुर्चीसाठी उगीच वाद घालू नका. खुर्चीवर वाद घालण्याची प्रथा शिवसेनेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या कोटीने बैठकीत एकच हशा पिकला. मात्र, सत्तार आणि खैरे यांना खुर्चीवरून त्यांनी चिमटा काढल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांत होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना