छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. खरे म्हणजे मुलगा असो वा मुलगी, जन्म ही एक आनंददायी घटना असते. जीवन हे नेहमीच प्रवाही असते. त्या प्रवाहाला जिवंत ठेवणारी स्त्री असते. म्हणून मुलींच्या जन्माकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
समतोल आणि न्याय्य समाजासाठी व निसर्ग नियमानुसार मुलामुलींचे प्रमाण समान असणे आवश्यक आहे. घटते बाल लिंग गुणोत्तर ही एक सामाजिक समस्या आहे. यासाठी सर्व स्तरातील जनतेने एकत्रित प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. २०२४ आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ८८९ मुली असे प्रमाण आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना होत आहेत.
आशेचा किरण; भेदभाव कधी दूर होणार?जानेवारी ते डिसेंबर २०२४ अखेर तालुकानिहाय जन्मतः लिंग प्रमाणाची आकडेवारी अभ्यासता छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री व सोयगाव वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये जन्मतः लिंग प्रमाण ९०० पेक्षा कमी आहे. मुलींच्या घटत्या प्रमाणाची किंमत संपूर्ण समाजासह सर्वांनाच चुकवावी लागेल, त्यापासून वाचायचे असेल तर शासनासोबत जनता व खासगी रुग्णालये, डॉक्टर आदींना पुढे यावे लागेल.
सोयगाव तालुक्यात मुलींचा जन्मदर अधिकतालुका -मुलींचा जन्मदरछत्रपती संभाजीनगर -९०८कन्नड- ८३७सोयगाव -९१८सिल्लोड -८४२फुलंब्री- ९०१खुलताबाद- ८४२वैजापूर- ८६१गंगापूर -८८२पैठण- ८२१
गर्भलिंगनिदानाचे नियम कठोरगर्भलिंग निदानाचे नियम कठोर आहेत. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी गर्भलिंग निदानास प्रतिबंध आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात वर्षभरात किती मुले जन्मली? (२०२४)तालुका -मुले -मुली -एकूणछत्रपती संभाजीनगर -२२,१३५-२०,०८९-४२,२२४कन्नड-१,७०२-१,४२५ -३,१२७सोयगाव-३०४- २७९- ५८३सिल्लोड- ३,४६४- २,९१६- ६,३८०फुलंब्री- ३०४- २७४- ५७८खुलताबाद- ४८७- ४१०-८९७वैजापूर- १,४६१- १,२५८ - २,७१९गंगापूर- १,१२६- ९९३- २,११९पैठण-१,३१६- १,०८१- २,३९७
मुलीच्या जन्माचे स्वागत करामहिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्यामुळे मुलीच्या जन्माचे स्वागत करावे. गर्भलिंगनिदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते.- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी