लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कर्जमाफीचा लाभ गरजू सर्वच शेतकºयांना मिळाला पाहिजे़ परंतु, कर्जमाफीनंतर कृषी संकट सुटणार का? यावर कोणीही बोलायला तयार नाही़ कर्जमाफीनंतरही शेतकºयांवर कर्जाचा बोजा वाढणारच आहे़ त्यामुळे शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे, अशी माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किशोर तिवारी म्हणाले की, परभणी जिल्ह्यात चालू वर्षी बँकांमार्फत केवळ २० टक्केच शेतकºयांना पतपुरवठा करण्यात आला आहे़ हा पतपुरवठा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़शासनाच्या कर्जमाफीचा लाभ गरजू शेतकºयांना झाला पाहिजे़ या योजनेचा दुरुपयोग होऊ नये, यासाठीच निकष लावण्यात आले आहेत़ कर्जमाफीनंतर कृषी संकट सुटणार का? यावर कोणीही बोलायला तयार नाही़ देशातील कोणत्याही राज्याने आतापर्यंत सरसकट कर्जमाफी दिलेली नाही़ मग महाराष्ट्रातच अशी का मागणी केली जात आहे? असा सवालही त्यांनी केला़ कर्जमाफीनंतरही शेतकºयांवर कर्जाचा बोजा वाढणारच आहे़ आता ५ लाख रुपयांचे असलेले कर्ज पुन्हा ५० लाख रुपयांचे होणार आहे़ त्यामुळे कर्जमाफीने प्रश्न सुटणार नसून, शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले पाहिजे़ त्यानुसार शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही तिवारी यांनी सांगितले़ यावेळी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते आदींची उपस्थिती होती़
कर्जमाफीनंतर शेतकºयांचे कृषी संकट सुटणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST